इंदापूर: महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत रत्नाई कृषी महाविद्यालय अकलूज यांच्या वतीने ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत शेतकऱ्यांना कीटकनाशक औषधांची फवारणी करताना घ्यावयाची काळजी याबाबत माहिती देण्यात आली.
अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. संग्राम सिंह मोहिते पाटील रत्नाई कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य मा. आर .जी. नलावडे प्रा. एस .एम .एकतपुरे ( कार्यक्रम समन्वयक), प्रा.एम .एम .चंदनकर (कार्यक्रम अधिकारी) प्रा. डी. पी. बरकडे यांच्या मार्गदर्शनानुसार कृषीदुत जयश शिंदे, विश्वजीत आदमाने, श्रेयस कुलकर्णी, आकाश माने, मेघराज पाडूळे, आदित्य कवळसकर, नवनाथ इरकर यांनी उपस्थितांना शास्त्रीय पद्धतीने फवारणी बद्दल माहिती दिली. या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना कीटकनाशक फवारणी करताना वापरण्यात येणाऱ्या साहित्याची माहिती दिली. तसेच फवारणी करताना कोणती काळजी घ्या याबाबत माहिती दिली.
*शेतकऱ्यांचा प्रतिसाद:-*
कृषी मित्रांनी दिलेल्या माहितीला प्रतिसाद देत शेतकऱ्यांनी कीटकनाशक फवारणी करताना फवारणी किट, मास्क, हातमोजे इ. साहित्यांचा वापर व योग्य की काळजी घेण्याचे आश्वासन विद्यार्थ्यांना दिले.