श्रीरामपूर प्रतिनिधी:
अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य समाज घटकातील दिन दलितांच्या व्यथा वेदना मांडणारे साहित्य आहे त्यांच्या साहित्याला वेगळीच धार आहे महाराष्ट्राच्या जडणघडणीत अण्णाभाऊंचे खूप मोठे योगदान असून साहित्यातले ते रत्न आहेत त्यामुळे त्यांचे साहित्य अमर असल्याचे मत सायमन भारस्कर यांनी व्यक्त केले.
तालुक्यातील वडाळा महादेव येथील ग्रामपंचायत कार्यालय सभागृहात राज्यस्तरीय अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन लोककला कलावंत साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित साहित्य संमेलनात अध्यक्ष भाषणात ते बोलत होते, याप्रसंगी प्रथम गावातून संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीचे मिरवणूक काढून ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले. चित्रपट गीतकार बाबासाहेब सौदागर, प्रा. डॉ बाबुराव उपाध्ये, कवी सुभाष सोनवणे, आला बाबूराव फेम सुरेश कांबळे, सामाजिक कार्यकर्ते लहानु खरात, विजय शेलार, सरपंच भरत पवार, दादासाहेब झिंज, रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष दादा त्रिभुवन, प्राचार्य गुंफा कोकाटे, सोसायटी चेअरमन दिलीपराव पवार आदी उपस्थित होते.
सायमन भारस्कर पुढे म्हणाले अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्याची मागणी गेल्या काही वर्षापासून होत आहे, एवढ्या मोठ्या साहित्याची भर टाकणाऱ्या या साहित्यिकाला अजूनही उपेक्षित ठेवले जात आहे, त्यांच्या अनेक कथा कादंबऱ्यावर चित्रपट निघाले असल्याचे ते म्हणाले.
चित्रपट गीतकार बाबासाहेब सौदागर आपल्या मनोगतात म्हणाले जीवनात हिणवणारी, थकवणारी माणसे भेटतात म्हणून आपण निराश व्हायचं नसतं, या सर्व गोष्टींना झुगारून पुढे जायचं असतं, माणसाच्या जीवनात जर गाणं नसेल तर त्या माणसाचं रडगाणं होतं म्हणून शब्दांशी मैत्री करा आणि मनसोक्त जगा असेही ते म्हणाले.
प्रा डॉ बाबुराव उपाध्ये आपल्या मनोगतात म्हणाले कठीण परिस्थितीतून मार्ग काढत पुढे जायला शिका, जो कठीण मार्गातून प्रवास करतो त्याचा प्रवास पुढे नक्कीच सुखकर होतो, सय्यद बाबा शेख,विजय शेलार, सुभाष त्रिभुवन आदींनी आपली मनोगत व्यक्त केली. दुपारच्या सत्रात सुभाष चारूडे यांच्या समाज प्रबोधनात्मक चित्रांचे प्रदर्शन पार पडले, कवी गोरखनाथ पवार यांच्या शब्दसुमने या कवितासंग्रहाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कवी संमेलन कवी गोरखनाथ पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.
सुरेश वैरागर, कृष्णा गहिरे, निवृत्ती महाराज कानवडे, संदीप कदम, शाहीर रेवननाथ देशमुख, बबन आढाव,गौतम वाघमारे, अश्विनी म्हात्रे, गीताश्री नाईक, सारिका सोनजे, अख्तर पठाण, आत्माराम शेवाळे,बाळासाहेब कोठुळे, योगिता कोठेकर, संजय माकोणे, संजय आहेर, सुभाष उमरकर,साहेबराव नंदन, राजेंद्र थोरात, वैजयंती सिन्नरकर, ओवी काळे आदिकवींनी आपल्या कविता सादर केल्या.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक लोकसा परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कवी बाबासाहेब पवार यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप कसार यांनी केले. या साहित्य संमेलनासाठी कवी लेखक रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या साहित्य संमेलनाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला.
*पत्रकार अमोल आर.शिरसाठ - श्रीरामपूर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर - 9561174111