shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

विरोधकांना तुरुंगात टाकण्यासाठी भाजपकडून सत्तेचा वापर - शरद पवार.

विरोधकांना तुरुंगात टाकण्यासाठी भाजपकडून सत्तेचा वापर - शरद पवार.
इंदापूर - खासदार संजय राऊत यांनी सरकारने चुकीच्या केलेल्या कारभारावर लिखाण केले. त्यांना तुरुंगात टाकले, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ऐकले नाही म्हणून त्यांच्यावर कारवाई केली. झारखंडचे मुख्यमंत्री यांना तुरुंगात पाठवले. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना ईडीची कारवाई करत तुरुंगात पाठवले. जनतेच्या मुलांसाठी त्यांनी आदर्श शाळा काढल्या. त्या शाळा हिंदुस्थानात आदर्श कार्य करत आहेत. ७८ आमदार केजरीवाल यांनी निवडून आणले. ९८ टक्के जनतेने संधी दिलेले लोकप्रिय मुख्यमंत्री यांना त्रास दिला जातोय. भाजप सत्तेचा वापर विरोधकांना तुरुंगात टाकण्यासाठी करते आहे, अशी टीका शरद पवार यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार आयोजित शेतकरी मेळावा (दि. २३) शहरातील इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत  माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.यावेळी इंदापूर येथे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत शनिवार (दि. २३) झालेल्या शेतकरी मेळाव्यात महाविकास आघाडीच्या जाहीर सभा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, व महाविकास आघाडीचे नेते शेतकरी हजारोच्या संख्येत पार पडली यावेळी शरद पवार बोलत होते. 

यावेळी शिवसेनेचे  खासदार संजय राऊत, काँग्रेस नेते व माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात, खा. सुप्रिया सुळे, आ. संजय जगताप, संग्राम थोपटे, रोहित पवार, शरयू फाउंडेशनच्या प्रमुख शर्मिला पवार, राजेंद्र पवार, जगन्नाथ शेवाळे, युवक नेते युगेंद्र पवार, राहुल मखरे,
अमोल भिसे, अशोक घोगरे, कालिदास देवकर,  अमोल देवकाते, आबासाहेब निंबाळकर, नितीन शिंदे, अमोल मुळे,  छाया पडसळकर यांच्यासह महाविकास आघाडीचे तालुक्यातील जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी शेतकरी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले की, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झालेल्या आजपर्यंत दिसले नाही. मी देशाचा कृषिमंत्री होतो तेव्हा भाजप विरोधी बाकावर होते. आक्रमक झाले होते तरी देखील कांद्याचे भाव खाली येऊ दिले नाहीत. कांद्याचे भाव कमी करा म्हणून भाजपच्या लोकांनी कांद्याच्या माळा घातल्या होत्या. मात्र मी सांगितले कांद्याच्या माळा घाला नाहीतर, कवड्याच्या माळा घाला. मी भूमिका बदलणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या घामाची किंमत मिळालीच पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.तसेच देशाचा राज्याचा कारभार कोणाच्या हाती द्यावा हा प्रश्न आपणास पडलेला आहे. भारतीय जनता पार्टीच्या हातात देशाची सत्ता आहे. लोकशाहीत सत्ता मिळणे आणि ती सत्ता लोकांसाठी वापरणे त्यामध्ये काही गैर नाही. सत्तेचा वापर करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तुम्हाला मला सगळ्यांना घटनेच्या आधाराने, मूलभूत अधिकार दिला त्या संविधानावर अन्याय होण्याची भीती आहे. त्यामुळे सामान्य लोकांनी जागृत राहणे गरजेचे आहे, असे आवाहन त्यांनी केले.

----------------------------------------

बारामतीत धमक्या द्याल; परंतु तुम्हाला मुंबईला यायचे आहे- खा.संजय राऊत.

 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले मी पुन्हा आलो, कसा आलो तर दोन पक्ष फोडून आलो. राजकारणातला माणूस विकासकामे सांगतो; परंतु हे महाशय म्हणतात दोन पक्ष फोडून आलो. अवघ्या चार महिन्यांत देशातील सरकार बदलणार आहे. आमची गॅरंटी आहे. महाराष्ट्रात तुम्ही व केंद्रात मोदी नसेल, तुम्ही जे पक्ष फोडले ते ईडी आणि सीबीआयच्या दहशतीवर फोडले. तिच यंत्रणा आता आमच्या हातात येणार आहे. तुमचा पक्ष शिल्लक राहतोय का पहा, असे थेट आव्हान भाजपला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी दिले आहे.
----------------------------------------
आ.बाळासाहेब थोरात म्हणाले, जो विरोधात बोलतो त्यांना आत मध्ये घाला ही भाजपची निवडणूक पद्धत वेगळी आहे तुम्ही नेत्यांना आत मध्ये घालू शकता पण जनतेला मतदारांना दाबू शकत नाही.

मेळाव्याचे प्रस्ताविक कार्याध्यक्ष महारुद्र पाटील यांनी तर आमदार रोहित पवार, तालुकाध्यक्ष अॅड. तेजसिंह पाटील तसेच इतर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन संजय शिंदे यांनी केले तर आभार सागर मिसाळ यांनी मांनले

----------------------------------------

मला इंदापूरकरांनी प्रेम दिल तेवढच शर्मिला वहिनी, राजू दादा, श्रीनिवास बाप्पू यांना दिले आहे. लोकशाही मार्गाने प्रचार करत आहेत. आहे तरी देखील विरोधक विनाकारण त्रास देत आहोत. इंदापूरमध्ये यंदा जोरदार तुतारी वाजणार याची मला गॅरंटी आहे.- 
सुप्रिया सुळे, खासदार
----------------------------------------
close