shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

बांडेवाडी शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.*


*बांडेवाडी शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.*
*विविध नृत्याविष्कार सादर करत चिमुकल्यांनी जिंकली उपस्थितांची मने.*

इंदापूर: दि ४ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडी बांडेवाडी यांचे संयुक्तपणे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाचे उद्घाटन वेळी छ शिवाजी महाराज व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमा पुजन व दीपप्रज्वलन पळसदेव ग्रा पंचायत सरपंच अजिनाथ पवार , उपसरपंच कैलास भोसले , सदस्य भालचंद्र बांडे , मेघराज पाटील , अंकुश जाधव , विकास शिंदे , बाळासाहेब पवार यांचे हस्ते करण्यात आले.
           स्नेहसंमेलनात बाल कलाकारांनी विविध प्रकारचे नृत्य आविष्कार लिलया सादर केले , मराठी , हिंदी चित्रपट गीतावरील नृत्य , लोकनृत्य , कोळी नृत्य , लावणी , देशभक्तीपर नृत्य , विनोदी नृत्य , गवळण , विनोदी नाटिका असे अनेक बहारदार कलाकृती मुलांनी सादर करत उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.
           कार्यक्रमासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बनसुडे , कर्मयोगी शंकररावजी पाटील साखर कारखान्याचे संचालक भुषण काळे , पळसनाथ विद्यालयाचे प्राचार्य बाळू काळे सर , पोलिस पाटील आप्पा बांडे पाटील , अनिल कुचेकर , दिपक बांडे , महेश बांडे , रणजीत काळे , अनिल नगरे , एस बी स्पोर्ट्स चे सागर बनसुडे , मिलिंद फासे , बाळाजी बांडे , रामदास बांडे , भिमराज नगरे उपस्थित होते. 
         ग्रा पं सदस्य मेघराज पाटील , माजी जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बनसुडे यांनी मुलांना शुभेच्छा दिल्या. शाळा समितीचे अध्यक्ष बापुसो राहिगुडे , उपाध्यक्ष राजू मुलाणी , सचिन बांडे , सतिष बांडे भाऊसाहेब कदम , सचिन बांडे , आण्णासाहेब बांडे , भगवान भोई  यांनी सर्वाचे श्रीफळ गुलाब पुष्प देवून स्वागत केले. 
         कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य संजय जाधव , बापू आदलिंग , सागर रणसिंग , स्वराज प्रतिष्ठानचे सुहास बांडे , सुरज गाडेकर , सुजित काळे , दिपक गाडेकर , वैभव रोकडे , विशाल जावळे , उमेश बांडे यांनी केले. नियोजन अंगणवाडी सेविका सुनंदा पोंदकुले , उर्मिला बांडे यांनी केले. आयोजन व सुत्रसंचालन मुख्याध्यापक संतोष हेगडे यांनी केले. आभार रामदास बांडे यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी पालक , ग्रामस्थ , युवक , महिला , जेष्ठ नागरिक , उपस्थित होते. 

close