shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

चिमुकल्या विद्यार्थ्यांबरोबर शिक्षिका रांधवणे मॅडम यांचा वाढदिवस साजरा



श्रीरामपूर प्रतिनिधी:
तालुक्यातील उंबरगांव - मुंगसेवस्ती शाळेच्या आदर्श शिक्षिका सुजाता रांधवणे मॅडम यांचा चिमुकल्या शालेय विद्यार्थ्यां समवेत मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला.

श्रीमती सुजाता मारुती रांधवणे मॅडम या जि.प.प्रा.शाळा मुंगसेवस्ती शाळेत उपाध्यापिका पदावर कार्यरत आहेत.शांत स्वभाव, विद्यार्थी प्रिय, गुणवंत, एक आदर्श अशा मुलांच्या आवडत्या शिक्षिका आहेत.आज त्यांचा वाढदिवस.शाळेतील सर्व मुलांनी एकत्र येऊन मोठ्या उत्साहाने साजरा केला. वाढदिवसानिमित्त सुजाता रांधवणे मॅडम यांनी सर्व  विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले, शाळेतील मुलांना शाळेची ,अभ्यासाची गोडी वाढावी म्हणून त्यांचे सतत नवनवीन उपक्रम चालू असतात .शाळेचा ध्यास, विद्यार्थ्यांचा विकास हाच मंत्र ते आपल्या विद्यार्थ्यांना, मुलांना प्रत्यक्ष अनुभव व कृतीतुन देत असतात.त्यांनी शाळेतील मुलांकरिता सतत नवनवीन  उपक्रम राबवून मुलांमध्ये गोडी निर्माण करत असतात.यापूर्वीही त्यांनी विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये मोलाचा वाटा उचलला आहे.प्रत्येक मूल शिकले पाहिजे ,शाळेत आले पाहिजे,ते टिकले पाहिजे म्हणून त्यांची सतत तळमळ असते.चांगले उपक्रम राबवून मुलांमध्ये शैक्षणिक गोडी निर्माण करण्यात त्यांचा हातखंडा हा सगळ्यांपेक्षा जरासा वेगळा आहे .आतापर्यंत त्यांनी विद्यार्थ्यांना तालुका, जिल्हा पातळीवरील विविध सांस्कृतिक , क्रीडा स्पर्धेत ,उत्तुंग यश मिळवलेले आहे . त्यांच्या अशा विविध विद्यार्थीभिमुख उपक्रमाचे श्रीरामपूरच्या गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी मॅडम,शिक्षण विस्तार अधिकारी संजीवन दिवे,मंगला गायकवाड, पढेगांव केंद्रप्रमुख राजू इनामदार, शाळेचे मुख्याध्यापक दिलीप शेंडे, उपाध्यापक अमोल गट सर, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष विजय गोपाळे, सरपंच अशोक नाना भोसले ,भारतभाऊ मुंगसे , विजया शिंदे,संगीता वायदंडे तसेच ग्रामस्थ,पालक सर्वांनी सुजाता रांधवणे मॅडम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

*पत्रकार सौ. सुनंदाताई शेंडे - श्रीरामपूर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close