कळस ( प्रतिनिधी ) सोलापूर येथे झालेल्या इन्स्पायर अवॉर्ड जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात कळसेश्वर विद्यालया ने बनवलेल्या बहुउद्देशीय सायकल कोळपे या प्रतिकृतीला प्रथम क्रमांक मिळाला आहे.
विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय भारत सरकार, राज्य विज्ञान संस्था नागपूर व जिल्हा परिषद सोलापूर व अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने 12 वे जिल्हास्तरीय इन्स्पायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शन सोलापूर या ठिकाणी आयोजित करण्यात आले. या प्रदर्शनामध्ये कळसेश्वर विद्यालयाचे बहुउद्देशीय सायकल कोळपे या प्रतिकृतीची जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. विद्यालयाच्या कु.अक्षदा संजय वाकचौरे ह्या इ.10 वी च्या विध्यार्थिनीने सदर प्रतिकृती सादर केले. या प्रतिकृतीची राज्यस्तरावर निवड झाली आहे. या प्रतिकृतीला विज्ञान शिक्षक शिवाजी आवारी यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
या मॉडेलची राज्यस्तरावर निवड झाल्याबद्दल जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती कैलासराव वाकचौरे, काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष सोन्याबापू वाकचौरे,संस्थेच्या सेक्रेटरी दुर्गाबाई नाईकवाडी,संस्थेच्या अध्यक्षा शैलजा पोखरकर,कार्याध्यक्ष सतीश नाईकवाडी, भाजपचे जिल्हा संयोजक भाऊसाहेब वाकचौरे, रिपाई चे तालुकाध्यक्ष सरपंच राजेंद्र गवांदे, शिवसेना समन्व्यक रावसाहेब वाकचौरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष ईश्वर वाकचौरे, सोसायटी चेअरमन विनय वाकचौरे, उपसरपंच केतन वाकचौरे, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुनिता शेलार , गीतांजली खरबस, मच्छिंद्र साळुंखे, केशव महाले, कुमार पालवे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.