काय आहे रामसर साईट
१९७१ ला इराण देशातील रामसर येथे नव्वद दशांचे संम्मेलन झाले.. ह्या संम्मेलनात जगातील ९० देशांनी दलदल असलेले प्रदेश / साईट संरक्षित क्षेत्र जाहिर करण्याचे ठरवले.. माझा भारत देश ह्या सम्मेलनाचा एक भाग होता.. १९७५ ला हा रामसर साईट करार सर्व देशांनी आमलात आणण्यास सुरूवात केली...
*२७ जानेवारी २०२० मध्ये भारतात नऊ ठिकाणे "रामसर साईट" म्हणून घोषित झाले.. महाराष्ट्रातील नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्याला व तिथल्या दलदलीला "रामसर साईट" म्हणून घोषित केले.. महाराष्ट्रातील पहिले "रामसर साईट" होण्याचा बहूमान मिळाला
नांदूरमधमेश्वर प्रकल्पात ५२६ प्रकारची जल व जमीनीवरील झाडी वेली च्या जाती, प्रजाती आहेत.. आठ सस्तन (मॅमल) आहेत... २३६ प्रकारचे पक्षी ह्या दलदल पानथळ वर अढळतात.. त्यात ८० पक्षी प्रजाती परदेशातून येतात.. फ्लेमिंगो हा पक्षी ऑस्ट्रेलिया वरून प्रवास करून नांदूरमधमेश्वरला येतो.. नांदूरमधमेश्वरला २४ प्रकारच्या गोड पाण्यातील माशांच्या प्रजाती इढळ होतात... ४१ प्रकारच्या फुलपाखरांच्या प्रजाती येथे अढळतात...
*आणि ह्याच नैसर्गिक सौंदर्याचा भाग म्हणून नांदूरमधमेश्वर अंतरराष्ट्रीय दर्जाचे पाणथळ दलदल "रामसर साईट" म्हणून घोषित झाले*
*नांदूरमधमेश्वरला दलदल , पाणथळ कसे?*
गोदावरी नदीवर निफाड तालुक्यातील नांदूरमधमेश्वर येथे ११०४ मीटर लांब, ५ मीटर रूंद, १५ मीटर खोल अशी भिंत बांधू़ १९०८ साली ब्रिटीशांनी गोदावरी उजवा व डावा कालव्यांसाठी हा नांदूरमधमेश्वर उन्नेयी बंधारा बांधला... ह्या धरणाच्या भिंतीमुळे गोदावरी नदी काठचे २९६ हेक्टर नदीकाठचे जमीनीचे क्षेत्र पाण्याखाली गेले म्हणून तात्कालीन ब्रिटीश शासनाने जमीन अधिग्रहित केली...
गेली १०० वर्ष गोदावरी डावा व उजवा कालवे बारमाही कालवे असल्यामुळे नादूरमधमेश्वर उन्नेयी बंधाऱ्यात दलदल निर्माळ झाली.. त्यात जैविकदृष्ट्या महत्व असलेल्या झाडांच्या ,जलचरांच्या प्रजाती निर्माण होऊन अंतरराष्ट्रीय दर्जाचे नैसर्गिक स्थान बनले
नांदूरमधमेश्वर बंधाऱ्याचे वरचे गावां मध्ये नदीकाठी गाळपेर जमीनीवर मोठे अतिक्रमणे झाली.. तेथे बेकायदेशीर बांधकामे झाली..बेकायदेशिर वीट भट्ट्या झाल्या.. नव्याने बांधलेल्या पुलाचे रेखांकनात चुक होऊन पुल पूराचे पाण्याखाली जाऊन दळणवळण तुटते असे कारणे देऊन नांदूरमधमेश्वर भिंतीला दरवाजे बसवण्याचा घाट स्थानिक लोकप्रतिनिधी व जलसंपदा विभागाने घातला आहे..
ह्या दरवाजांमुळे पुराच्या पाण्यात सर्व जलसृष्टी उध्वस्त होणार... पक्षांना खाद्य राहणार नाही म्हणून पक्षी अभयारण्य उध्वस्त होणार
अंतरराष्ट्रीय रामसर कराराचा भंग होणार .. पाणथळ दलदल नष्ट होणार केवळ अतिक्रमणे वाचवून पैसे कमवण्याचे नादात... मी एक निसर्ग प्रेमी म्हणून जलसंपदा विभागाचे दरवाजे बसवणेच्या प्रकल्पाला कडाडून विरोध करतो.. निसर्ग व जीव सृष्टी वाचवा...
संजय भास्करराव काळ
कोपरगाव