श्रीरामपूर प्रतिनिधी:
आज वाचन संस्कृती जोपासली पाहिजे. श्रीरामपूर येथे वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक,अध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये हे१९७८ पासून साहित्य क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी अनेक छोट्या, मोठ्या उपक्रमांच्या माध्यमातून आणि साहित्य संमेलन, परिसंवाद आणि पुरस्कार, लेखन उपक्रमातून शेकडो कवी, लेखकांना प्रेरणा देण्याचे काम केले आहे. लांना श्रीरामपूर भूषण पुरस्कारही प्राप्त झाला आहे. त्यांचे हे कार्य आणि व्यक्तिमत्व भूषणावह असल्याचे मत छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. सौ. मंजुषाताई शेरकर यांनी व्यक्त केले.
येथील प्राचार्य शंकरराव अनारसे यांच्या 'शब्दवैभव' प्रकाशन सोहळ्यानंतर झालेल्या डॉ. उपाध्ये सत्कार प्रसंगी डॉ.सौ. शेरकर बोलत होत्या. याप्रसंगी माजी प्राचार्य शंकरराव अनारसे, सौ. कमलताई अनारसे, डॉ.अशोकराव शेरकर, डॉ. संजय अनारसे, डॉ.सौ. योगिता अनारसे यांनी डॉ. उपाध्ये यांचा सन्मान केला. अनारसेसाहेब यांचे लेखन प्रकाशित करण्यात आणि अनेक पुस्तकांना लेखन स्वरूपात आणण्यात डॉ. उपाध्ये यांचा मोठा सहभाग आहे. आमचा मुलगा अवधूत शेरकर हादेखील
वाचन संस्कृती जोपासण्यासाठी कार्यरत असून त्याची स्वतंत्र लायब्ररी आहे. असे सांगून अवधूत युटुब विषयी त्यांनी माहिती दिली. युटुब वरील चित्रफित दाखविली. श्रीपमपुरात डॉ उपाध्ये हे अनेक साहित्यिकांना अनेकप्रकारे सर्व मदत करतात. हे कार्य भूषणावह आहे, असे डॉ. सौ. शेरकर यांनी शोभिवंत टोपी, शाल, बुके, भेटवस्तू देऊन सत्कार केला, डॉ. उपाध्ये यांनी आपले जीवनानुभव सांगून साहित्य ही समाजाची अमृतकुपी आहे ती वाढविली पाहिजे असे सांगून अनारसे, शेरकर परिवाराचे आभार मानले.
*ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111