shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

श्रीरामपूरच्या साहित्यिकांचे एकात्म आणि सेवाभावी योगदान आदर्शवत- प्राचार्य डॉ. मधुकर सलगरे

श्रीरामपूर प्रतिनिधी:-
श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली श्रीरामपूर नगरी भूषणावह असून येथील साहित्यिकांचे एकात्म आणि सेवाभावी योगदान आदर्शवत असल्याचे मत लातूर येथील ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ.मधुकर सलगरे यांनी यांनी व्यक्त केले.


  येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठान, स्नेहपरिवार ग्रुप, विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानतर्फे प्राचार्य डॉ.सलगरे यांच्या साहित्य, शिक्षण, समाज आदर्श कार्याबद्दल सन्मानचिन्ह, बुके, शाल, पुस्तके देऊन सन्मान करण्यात आला. त्याप्रसंगी प्राचार्य डॉ. सलगरे बोलत होते.    अध्यक्षस्थानी स्नेह परिवार ग्रुपचे संस्थापक,अध्यक्ष प्राचार्य टी.ई. शेळके होते.डॉ.बाबुराव उपाध्ये यांनी स्वागत, प्रास्ताविक करुन उपस्थितींचा परिचय करून दिला. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक आणि श्रीरामपूर तालुका पेन्शनर्श असोसिएशनचे अध्यक्ष श्री. के. एल. खाडे यांनी ९४ व्या वर्षाच्या वाटचालीत केलेले सामाजिक, साहित्यिक, रेल्वे, श्रीरामपूर शहर आणि ज्येष्ठ नागरिकांच्या      सेवाकार्याविषयी प्राचार्य डॉ. सलगरे आणि उपास्थितांनी सन्मान केला. प्राचार्य डॉ. सलगरे यांनी भारतीय सनातन परंपरा ते आधुनिक युगातील बदलते समाजमन याविषयी विस्तृत विवेचन केले. आक्रमक आणि संस्कृती संघर्ष विशद केला. वेदव्यास ऋषी यांचे कार्य महान आहे. व्यासपीठ हाच शब्द लेखन, भाषण आणि प्रबोधन पीठावर योग्य आहे. श्रीकृष्ण हे सर्वमान्य कर्तृत्व आहे, ते भारतीयांना अस्सल श्रीकृष्ण संदर्भात त्यांनी समजावून दिले. श्रीकृष्ण जीवनावर केलेल्या लेखनावर " महर्षी व्यासांचा कृष्ण भगवान" हा समीक्षाग्रंथ त्यांनी उपस्थित मान्यवरांना भेट म्हणून दिला. इतर लिहिलेल्या नऊ पुस्तकावर चर्चा केली. श्रीरामपूर साहित्यिक व श्री. के. एल्. खाडे यांचे कार्य आदर्शवत आहे असे सांगून आपली ग्रंथसंपदा आपण वाचकांना, ग्रंथालयास मोफत देतो,वाचन चळवळीला बळ दिले पाहिजे असे त्यांनी सांगितले. यावेळी प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे, सुखदेव सुकळे, प्रा. शिवाजीराव बारगळ, लातूरचे पत्रकार उज्वलकुमार माने, साहित्यिक सतिश मोरे, प्रणव रणदिवे यांनी के. एल्. खाडे आणि श्रीरामपूर साहित्यिकाविषयी कौतुक केले. प्राचार्य शेळके म्हणाले, ॲङ रावसाहेब शिंदे आणि प्राचार्य डॉ. सलगरे यांची मैत्री फार प्रेरणालयी आहे. रावसाहेब शिंदे यांनी आपल्या जीवनात नैतिकता आणि साहित्यसेवा जपली. अनेक गुणवान माणसे जोडली. शरपंजरी पडलेते समाजसेवेतील भीष्माचार्य स्वरूप असलेले श्री के. एल. खाडे यांच्या प्रेमाने प्राचार्य डॉ. सलगरे त्यांचा मित्रपरिवार श्रीरामपुरात आले. खाडे परिवाराचा योग्य सन्मान केला, ही एक जीवन प्रेरणा आहे. साहित्यिक हे नेहमी भेटतात, संवाद करतात आणि सदिच्छा भेट देतात माणसाला असे उपक्रम जीवनऊजा देतात. असे सांगितले. सुभाबराव खाडे, प्रमिलाताई खाडे, सुलोचनाताई अशा खाडे परिवाराने प्राचार्य डॉ. सलगरे यांचाही उचित सन्मान केला, अतिशय प्रभावी नियोजन केले, त्याबद्दल सुभाष खाडे यांचे सर्वांनी कौतुक केले.प्राचार्य शेळके यांनी प्राचार्य डॉ. सलगरे यांच्या भेटीचा साहित्यिक आनंद व्यक्त केला. यावेळी डॉ.बाबुराव उपाध्ये संपादित ' विचारवेध' हा खाडे गौरवग्रंथ भेट म्हणून देण्यात आला. सूत्रसंचालन डॉ. उपाध्ये यांनी केले तर सुभाष खाडे यांनी आभार मानले.

वृत्त विशेष सहयोग
प्रा.डॉ.बाबूराव उपाध्ये (सर)
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close