shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

*लक्ष्मी नृसिंह मंदिर नरसिंहपुर येथे इंदापूर तालुका काँग्रेसचा नारळ फोडून सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराचा शुभारंभ.

*लक्ष्मी नृसिंह मंदिर नरसिंहपुर येथे इंदापूर तालुका काँग्रेसचा नारळ फोडून सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराचा शुभारंभ.
  
पुणे (इंदापूर): लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीला वेग आला आहे.बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांचा इंदापूर तालुका काँग्रेसच्या वतीने प्रचाराचा शुभारंभ इंदापूर तालुक्यातील नरसिंगपूर येथील नरसिंह मंदिर या ठिकाणी इंदापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आबासाहेब निंबाळकर यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आला . या वेळी  प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनीही  उपस्थिती लावली होती.   प्रचार शुभारंभाच्या या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आबासाहेब निंबाळकर म्हणाले की, इंदापूर तालुक्यातील जनता ही काँग्रेसवर प्रेम करणारी आहे. त्यामुळेच काँग्रेसच्या विचारांच्या पाठिशी इंदापूरकर कायम राहिल्याचे निंबाळकर यांनी सांगितले.आजपर्यंत प्रत्येक निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना इंदापूर तालुक्यात जास्तीचे मताधिक्य मिळवून देण्यामध्ये काॅंग्रेस पक्ष नेहमी अग्रेसर राहिला आहे.त्याचप्रमाणे यावेळीही काॅंग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही तालुक्यातील प्रत्येक मतदारांपर्यंत जाऊन महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना विजयी करण्याचे आवाहन करणार आहे असे निंबाळकर यांनी सांगितले.
      
      यावेळी काँग्रेसच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांनी लक्ष्मी नृसिंह  देवाला साकडे घालून या निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळू दे, अशी प्रार्थना केली.
      यावेळी इंदापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आबासाहेब निंबाळकर, तालुका काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष तानाजी भोंग, इंदापूर तालुका काँग्रेस ओबीसी सेल चे अध्यक्ष बापूसाहेब बोराटे, तालुका सरचिटणीस दिलीप सोनवणे, एसी सेलचे तालुका अध्यक्ष युवराज गायकवाड,तालुका काँग्रेस चे उपाध्यक्ष राहुल आचरे,युवक काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष अमोल बंडगर,तालुका युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अरुण राऊत, माळवाडी ग्रामपंचायत चे विद्यमान सदस्य बापू व्यवहारे, युवा नेते लखन नरबट , संतोष जाधव, तुषार वाघमोडे, अक्षय मिसाळ, दिपक आरडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
close