पुणे प्रतिनिधी:
प्रत्येकाचं आयुष्य हे क्षणभंगुर आहे, येथे प्रत्येकाला जन्म आणि मृत्यू या दोन्ही गोष्टी अटळ आहे. परंतु आज तसे पाहता प्रत्येक माणूस हा धनसंपत्ती गोळा करण्याच्या शोधामुळे स्वतःचे आणि कुटुंबाचे आयुष्य जगणं विसरला जात आहे.येथे सर्वांनी मिळालेल्या आयुष्याचा आनंद घेणे आणि त्याचबरोबर आपले मुलं, कुटुंब यांना नेहमी सुसंस्कारित करणे यालाच खऱ्या अर्थाने माणूस म्हणून जगणे असे म्हटले जाते असे प्रतिपादन व्हर्लपूल इंडिया कंपनीचे संचालक उद्योजक महेंद्र पाटील यांनी काल हयात हॉटेल पुणे येथे कार्यक्रम प्रसंगी माध्यमाशी बोलताना केले. यावेळी महेंद्र पाटील यांच्या सुविद्य पत्नी मनीषाताई पाटील डायरेक्टर मयुरी इंडस्ट्री पुणे व चिरंजीव सानिध्य पाटील यांची देखील खूप मोलाची साथ महेंद्र पाटील यांना लाभली आहे.
यावेळी आपल्या पत्नीमुळे खऱ्या अर्थाने प्रत्येक माणूस यशस्वी होत असतो असेही मत श्री.पाटील यांनी व्यक्त केले.आपण कुटुंबासाठी, कुटुंब आपल्यासाठी आणि देश सर्वांसाठी महत्त्वाचा आहे. अशी भावना प्रत्येकाच्या मनात असणे गरजेचे आहे.असे असल्यास देश नक्कीच महासत्ता होईल असेही ते म्हणाले.
यावेळी नरेंद्र पाटील व भूमी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कैलास पवार आदि मान्यवर उपस्थित होते.
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111