shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

ऐतिहासिक भिडे वाड्यातील कवी म्हणून कवी विनोद अष्टुळ यांना मिळाला सन्मान !


पुणे प्रतिनिधी:
साहित्य सम्राट पुणे या साहित्यिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कवी विनोद अष्टुळ यांनी पुणे जिल्ह्याच्या विविध भागात उद्याने, मंदिरे, सभागृहे, शाळा, कॉलेज, स्मशानभूमी आणि उत्सवांमध्ये १८२ खुली कवीसंमेलने घेतली आहेत. साहित्य हे समाजाच्या  सर्व घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी दांडेकर पूल येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त पदपथावर सुद्धा कवी संमेलन घेतले. अष्टुळ हे साहित्य, साहित्यिक आणि साहित्य संस्था यांना नेहमीच निस्वार्थपणे साथ देत असतात. असे विचार कार्यक्रमाचे अध्यक्ष, आयोजक  भिडवाडाकार विजय वडवेराव यांनी भिडेवाडा बोलला आंतरराष्ट्रीय काव्यलेखन स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यात महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुणे येथील सभागृहात व्यक्त केले.


यावेळी विचारपीठावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मराठी भाषा अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ.संदीप सांगळ, कवी विजय वडवेराव आणि गझलकार म.भा.चव्हाण  उपस्थित होते.
 १३ जुलै २०१५ रोजी भिडेवाडा बोलला कवितेवर आधारित ऐतिहासिक कविसंमेलनामध्ये कवी विनोद अष्टुळ यानी भिडे वाडा साफ करण्यापासून ते कवी संमेलन पार पाडण्यासाठी महत्त्वाची साथ दिली. अष्टुळ यांनी भिडेवाडा संमेलनात  भ्रुणहत्या विषयीची गुन्हा ही कविता सादर केली. तसेच अष्टुळ यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मराठी अभ्यासक्रमातील संदर्भ ग्रंथांत फकीरा या कादंबरीतील जोगणी या शूर प्रथेच्या शब्दाची झालेली चूक दाखवण्यासाठी पाच वर्षे लढा दिला. विद्यापीठासमोर उपोषण केले आणि जोगणी शब्दाला तसेच साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांच्या फकीरा कादंबरीला न्याय मिळवून दिला.  अशी ऐतिहासिक कामगिरी करणारे विनोद अष्टुळ  यांना ऐतिहासिक भिडे वाड्यातील कवी म्हणून विचारपीठावरील  मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.


 यावेळी भिडे वाडा बोलला आंतरराष्ट्रीय काव्यलेखन स्पर्धेतील कवी कवयित्री, भिडे वाड्यातील कवी कवयित्री आणि इतर मान्यवर साहित्यिक उपस्थितीत होते. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मीनाक्षी जगताप सूरत व स्नेहल पोटे बेळगाव यांनी केले.
*पत्रकार लक्ष्मण संभाजी भिसे - इंदापूर*
ब्यूरो चिफ: पुणे जिल्हा
स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
close