shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

राष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धेत मुंबईला तिहेरी मुकुट


मुंबई प्रतिनिधी:
मुंबई - चंदीगड येथील पंजाब युनिव्हर्सिटीमध्ये नुकत्याच वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. मुलांच्या २४ तर मूलींच्या २० संघांनी आपला सहभाग नोंदवला. मुंबई मुले, मूली व मिक्स या तीनही संघांनी सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. या स्पर्धांमध्ये मुंबईने तिहेरी मुकुट पटकावला. 

          मुलांच्या अंतिम सामन्यात मुंबई संघाने आंध्रप्रदेश संघावर १० गुणांनी मात करुन विजेतेपद पटकावले. मुंबईच्या मनीष निराला (कर्णधार), अभिषेक चौधरी, विकास बारीक, ललित नवाळी व सुरजभान यादव या अनुभवी खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली.
          मुलींच्या अंतिम सामन्यात मुंबई संघाने बिहारचा २ गुणांनी धक्कादायक पराभव करुन विजयश्री खेचून आणली. मुंबईच्या आस्था शिंगाडे (कर्णधार), स्वरा अलोणे, नेत्रा कंसारा, तनुषा वाघ व प्रेरणा बाणे यांनी आक्रमक खेळी केली. 
          मिक्स गटाच्या अंतिम सामन्यात मुंबई संघाने दिल्ली संघाला ८ गुणांनी पराभूत केले. नरेश राऊत (आंतरराष्ट्रीय खेळाडू), विकास बारीक, मनिष विश्वकर्मा, सानिका पाटील व चैत्रवी तावडे यांनी दमदार खेळी केली. अशा प्रकारे तिन्ही गटात मुंबई संघाने तिहेरी मुकुट पटकावला.
          भारतीय डॉजबॉल महासंघाचे महासचिव डॉ. पी. एस. बरार, हाय पॉवर कमिटीचे पदाधिकारी डॉ. जी. पी. पाल, ख्वाजा अहमद, मुंबई डॉजबॉल असोसिएशनचे अध्यक्ष अरविंद (दादा) प्रभू व सचिव जगदीश अंचन यांनी विजयी संघाचे अभिनंदन केले.
*ज्येष्ठ पत्रकार नारायण सावंत - मुंबई* 
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
close