अहमदनगर प्रतिनिधी:
सर सय्यद अहमद खान यांच्या पुण्यतिथी निमित्ताने अहमदनगर शहरातील मुकुंदनगर येथील उर्दू शाळेत शालेय विद्यार्थ्यांना पुस्तके वाटून त्यांच्या अजोड शैक्षणिक कार्यांना उजाळा देण्यात आला. या कार्यक्रमास मख़दुम एज्युकेशन अॅण्ड वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष आबीद दूल्हेखान,मुस्कान असोसिएशनचे अध्यक्ष सय्यद शफाकत तथा मखदुम सोसायटी व रहेमत सुलतान फौंडेशनचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना आबीदखान म्हणाले की, सन १८५७ मध्ये इंग्रजाविरोधात जे बंड पुकारले यामध्ये भारतवासी सहभागी झाले होते.परंतु या बंडाचे खापर इंग्रजांनी मुस्लिमांवर थोपले व मुस्लिमांची संपत्ती, घरे, दुकाने नष्ट केली. त्यांना तोफांनी उडविले, सुळावर लटकाविले, काळ्यापाण्यावर पाठविले, त्यांची मालमत्ता जप्त केली, सरकारी नोकरी देणे बंद केले. फक्त मजुरीचीच कामे देण्यात येवू लागली. इंग्रजांनी फारसी भाषा बंद करुन इंग्रजी भाषाला सरकारी भाषेचे स्थान दिले. परंतु इंग्रजांच्या या अत्याचारिता जुल्मांमुळे मुस्लिम समाजामध्ये इंग्रज व इंग्रजी भाषेविषयी चिड निर्माण झाली व ते इंग्रजी शिकायला तयार नव्हते, इतर समाजाने त्यावेळी इंग्रजी भाषा आत्मसात केली होती. त्यामुळे विकासाच्या मार्गाने ते पुढे गेले, पण मुस्लिम समाज इंग्रजी भाषेस स्विकारण्यास तयार नव्हता म्हणून तो सर्वच क्षेत्रात मागे राहिला. अशावेळी सर सय्यद अहेमद खान यांनी समाजाला इंग्रजी शिकण्याचे व शिक्षण घेण्याचे अनुरोध केला. अशावेळी समाजातूनच सर सय्यद अहेमद खान यांना विरोध झाला, मात्र त्यांनी हा विरोध स्विकारुन समाजमन वळविण्याचा प्रयत्न चालूच ठेवला व त्यासाठी ते सतत झटत राहिले, असे प्रतिपादन मख़दुम एज्युकेशन अॅण्ड वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष आबीद दूल्हेखान यांनी केले.
मख़दुम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीच्यावतीने सर सय्यद अहेमदखान यांच्या पुण्यतिथी निमित्त शहरातील मुकुंदनगर येथे उर्दु शाळां मध्ये उर्दु बाल साहित्याची पुस्तके मोफत वाटप करण्यात आले. यावेळी मुस्कान असोसिएशनचे अध्यक्ष सय्यद शफाकत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
पुढे बोलताना आबीद खान म्हणाले, सर सय्यद यांनी १८५७ मध्ये मॉमिडियन अॅग्लो ओरिअंटल कॉलेजची स्थापना केली. दर्जेदार शिक्षण येथील विद्यार्थ्यांना मिळावे, यासाठी त्यांनी परदेशी जाऊन तेथील शिक्षणापद्धतीचा अभ्यास करुन अनेक आंतरराष्ट्रीय विद्यापीठांना भेट दिल्या व भारतात आल्यावर त्यांनी त्यादृष्टीने प्रयत्न करुन कॉलेजचा नावलौकिक वाढविला आणी १९२० मध्ये विद्यापीठाचा दर्जा मिळविला ज्यास आज आपण अलिगढ मुस्लिम विद्यापीठ या नावाने ओळखतो असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शफकत सय्यद यांनी मानले. कार्यक्रमास मखदुम सोसायटी व रहेमत सुलतान फौंडेशनचे पदाधिकारी आणी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*ज्येष्ठ पत्रकार आबीदखान - अहमदनगर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर -
*9561174111