shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

शिक्षणाबरोबरच अन्य क्षेञात करिअरची संधीः अभिनेञी प्राजक्ता घाग


 श्रीरामपूर प्रतिनिधी:
 शिक्षणाबरोबरच अन्य क्षेञ महत्वाची असतात. कला, क्रीडा आदी क्षेञातही करिअरला मोठी संधी आहे. मी स्वतः इंजिनियर व जिम ट्रेनर असून अभिनयाच्या क्षेञात कार्यरत आहे. सध्याच्या स्पर्धेच्या युगात आपण मेहनत घेतली तर हमखास यशस्वी होता येते असे प्रतिपादन ख्यातनाम मराठी अभिनेत्री प्राजक्ता घाग यांनी केले.
तालुक्यातील अशोकनगर येथील अशोक पाॕलिटेक्निक,अशोक फार्मसी महाविद्यालय व भास्करराव गलांडे पा. आय. टी. आय. च्या संयुक्त स्नेहसंमेलनाच्या प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी माजी आ. भानुदास मुरकुटे होते. यावेळी व्हा.चेअरमन पुंजाहरी शिंदे, अशोक बँकेचे चेअरमन ॲड. सुभाष चौधरी, संचालक सोपानराव राऊत, हिम्मतराव धुमाळ, बाबासाहेब आदिक, आदिनाथ झुराळे, योगेश विटनोर, विरेश गलांडे, अमोल कोकणे, भाऊसाहेब कहांडाळ, भाऊसाहेब हळनोर, सिध्दार्थ मुरकुटे, शिक्षण संस्थेच्या कार्यकारी अधिकारी सौ.मंजुश्रीताई मुरकुटे, शालिनीताई कोलते, सखाराम कांगुणे, भाऊसाहेब दौंड, प्राचार्य डाॕ.सुनिताताई गायकवाड, रोहन डावखर, कार्यकारी संचालक संतोष देवकर, कारेगाव भागचे चेअरमन हरिदास वेताळ, संचालक गिताराम खरात, शिवाजी मुठे, भाऊसाहेब हळनोर, दशरथ पिसे, विशाल धनवटे, संदीप डावखर, संजय लबडे, बहिरुनाथ कांगुणे, सुरेश महाडीक, शितल लहारे, सविता वाडीले, अशोक पारखे, गणेश छल्लारे, किशोर बनसोडे, रंगराव रंजाळे, प्राचार्य संपत देसाई आदि उपस्थित होते. सौ. घाग यांनी गुलाबी साडी या गाण्यावर नृत्य करून प्रेक्षकांची मने जिंकली. 


               कार्यक्रमाचे प्रास्ताविकात अशोक शिक्षण संस्थेच्या कार्यकारी अधिकारी सौ. मंजुश्रीताई मुरकुटे म्हणाल्या की, माजी.आ.भानुदास मुरकुटे यांचे मार्गदर्शनाखाली शैक्षणिक संकुलाची वाटचाल सुरु आहे. यावर्षी फार्मसी महाविद्यालय कार्यान्वित झाले असून पुढील वर्षी बी. फार्मसी तसेच इंजिनिअरिंग महाविद्यालय सुरु करणेचा मनोदय आहे.   
            पॉलिटेक्निकचे प्राचार्य अंजाबापू शिंदे, फार्मसीचे प्राचार्य प्रसाद कोते, आयटीआयचे प्राचार्य रईस शेख यांनी अहवाल वाचन तर पुरस्कारार्थी वाचन अरूण कडू, वैशाली सूकेकर, दत्तात्रय झुराळे यांनी केले. यावेळी स्टुडंट ऑफ द इयर वैष्णवी कांडेकर व वरूण कहांडळ तर चॅम्पियनशिप मॅकेनिकल इंजिनीअरिंग विभागास व इतर गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
मुळा प्रवराचे संचालक सिद्धार्थ मुरकुटे व सौ. मंजुश्रीताई मुरकुटे यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी मुला-मुलींनी विविध मराठी, हिंदी गाण्याच्या तालावर ठेका धरत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. पालकानी कलाकाऱ्यांच्या कलागुणांचे कौतुक करून भरभरून दाद दिली. त्यात प्रथम क्रमांक फरहान पिंजारी, व्दितीय फार्मसीस्ट ड्रामा तर आयटीआय ड्रामा ला तृतीय क्रमांक देण्यात आले. अध्यक्षीय सूचना अनंत खंडागळे, तर अनुमोदन महेश पवार यांनी दिले. अतिथी परिचय स्मिता खर्डे व आभार प्रचिती जाधव यांनी मांडले.
*पत्रकार अफजल मेमन - श्रीरामपूर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close