श्रीरामपूर प्रतिनिधी:
श्रीरामपूर येथील नगर पालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे स्वच्छ श्रीरामपूर सुंदर श्रीरामपूर चे तीन तेरा वाजले असल्याचे दिसून येत असून, येथील वॉर्ड क्र.२ मधील वैदूवाडा परीसरातील पाटाच्या पुलाजवळील काही घरांमध्ये चक्क गटारीचे घाण पाणी शिरल्याने येथील रहीवासी शेख फारुक गयासुद्दीन यांच्यासह इतर अनेक नागरीकांना रमजानच्या या पवित्र महीन्यात प्रार्थनेसाठी घराबाहेर पडून मशिदीत जाणे देखील मोठे दुरापास्त झाले आहे.
यामुळे येथील नागरीकांच्या मनात नगर पालिका प्रशासनाविरुद्ध मोठी चीड निर्माण होवून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. कायमच्याच या गंभीर समस्येंमुळे काही नागरीक तर आपले घरे सोडून इतरत्र रहावयास गेले व जावू लागले आहेत, सततच्या या प्रकारामुळे शहरात रोगराई पसरण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे, त्यावर सदरील ठिकाणी पाण्यावर मृत्यूला निमंत्रण देवू पाहणाऱ्या स्ट्रिट लाईटच्या काही तुटलेल्या अवस्थेतील लोंबकळत्या वीजेच्या तारा आणी रस्त्याच्याकडेला गटारीच्या घाण पाण्याने तुडुंब भरलेल्या परिसरातील रस्त्यांसह गटारींचे खोल ढापे, यात बुडून एखाद्या निर्पराधाचा जीव जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे, यावर वेळोवेळी तक्रार करुनही श्रीरामपूर नगर पालिका प्रशासन मात्र कुंभकर्ण झोपेत असल्याने या गंभीर समस्यांप्रकरणी श्रीरामपूर नगर पालिका प्रशासक तथा प्रांताधिकारी साहेबांनी वेळीच जातीने लक्ष घालून या समस्यांचा बिमोड करावा अशी परिसरातील त्रस्त नागरीकांकडून मागणी केली जात आहे.
गत पाच दिवसांपासून सदरील गटारीचे घाण पाणी परिसरातील नागरिकांच्या घरात शिरले आहे, सदरील त्रस्त नागरीक वारंवार नगर पालिका प्रशासनाकडे तक्रार करत आहेत, मात्र नगर पालिकेचे संबंधित कर्मचारी कधी तरी येवून थातूरमातूर पद्धतीने कामे करुन निघून जातात समस्या मात्र काही जात नाही असे या परीसरातील नागरीकांची तक्रार आहे.
त्यावर सध्या नगर पालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांची अन्यत्र बदली झाली असल्याने त्यांच्या जागी आलेले नुतन मुख्याधिकारी महोदयांनी पदभार तर स्विकारला मात्र कामांस सुरुवात कधी करणार याकडे देखील शहरवासियांचे लक्ष लागले आहे,शहरातील घनकचरा असो वा गटारे साफसफाई या विषयी शहराच्या प्रत्येक प्रभागात अशीच भयावह परिस्थिती निर्माण झालेली आहे,हे शहरवासियांचं दुर्भाग्य म्हटल्यास वावगे ठरु नये अशाप्रकारची सध्या गंभीर स्थिती निर्माण झालेली असल्याचे बघावयास मिळत आहे.
यामुळे शहरात रोगराई पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
यावर नगर पालिका प्रशासक तथा प्रांताधिकारी महोदयांनी शहर परीसराचा एक फेरफटका मारावा तथा शहरातील विविध नागरी समस्या स्वतःहुन बघत त्रस्त नागरीकांच्या समस्या दुर करणेकामी तात्काळ आदेश द्यावेत अशी मागणीही काही सुज्ञ सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.
*पत्रकार राजु मिर्जा*
ब्युरो चिफ: नाशिक विभाग
स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111