तेजपृथ्वी ग्रुपच्या वतीने दुष्काळजन्य परिस्थितीवर उपाययोजना कराव्या म्हणून इंदापूर तहसीलदार यांना दिले निवेदन.
राजकारनाच्या गर्दीतही शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणारा सामाजिक तेजपृथ्वी ग्रुप .
इंदापूर:- तेजपृथ्वी ग्रुपच्या वतीने इंदापूर तहसीलदारांना इंदापूर तालुक्यातील पाणीटंचाई बाबत ठोस निर्णय घ्यावेत तसेच इंदापूर तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, मुलांची फी माफ करावी, शेतकऱ्यांच्या जनावरासाठी गावोगावी चारा छावणी काढावी,गावोगावी पाण्याचे टँकर चालू करावेत यासाठी निवेदन देण्यात आले.
यावेळी अनिताताई खरात म्हणाल्या की, सध्या राजकीय वातावरण गरम झाले आहे. परंतु त्याचवेळी माझ्या शेतकरी राजाचेही हाल चालू आहेत. पाण्याने विहिरीचा तळ गाठला आहे. पिके जळून खाक होत आहेत. जनावरांना व माणसांनाही पिण्यासाठी पाणी उपलब्ध नाही. अजून चार आठ दिवसांनी पाण्यासाठी लोकांना वणवण करावे लागेल. माझी शासकीय अधिकाऱ्यांना विनंती आहे .या सर्व गोष्टीचा विचार करून आपण शेतकऱ्याकडे लक्ष द्यावे व इंदापूर तालुका दुष्काळी जाहीर करून दुष्काळातील सर्व उपाययोजना तालुक्यातील प्रत्येक गावागावात लागू कराव्यात. इंदापूर तालुक्याच्या बाजूने जाणाऱ्या निरा नदीला चिमणीला पिण्यासाठीही पाणी नाही .उजनी ही मायनस मध्ये गेली आहे . तसेच थोडाफार बोरला, विहिरीला असणार पाणी तळाला जाऊन बसले आहे.याचा विचार करून शासनाने त्वरित हा विषय मार्गी लावावा. शेतकऱ्यांना जी दोन आवर्तने देण्याचे ठरले त्यावरील लवकरात लवकर विचार करून पाणी सोडावे. राज्य सरकारने राजकारणाबरोबर शेतकऱ्यांवर ही लक्ष केंद्रित करावे . या सर्व गोष्टींसाठी आज इंदापूर तहसीलदार यांना निवेदन दिले आहे व दुष्काळी परिस्थितीवर लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात अशी विनंती केली आहे.
तेजपृथ्वी ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा सौ अनिताताई खरात,सद्दाम बागवान, लक्ष्मण वाघमाडे,संदिप रेडके,, गणेश शिंगाडे,रुपेश वाघमोडे ,ओंकार पेंडावळे, नारायण हरणावळ, आबा देवकर, तानाजी हेगडकर यांच्या सहीचे निवेदन तहसीलदाराना देण्याचा आले.