जो माणूस मेहनती असतो. व्यवसाय आणि काम करण्याची जिद्द असते. तीच माणसं आयुष्यामध्ये पुढे जातात- हर्षवर्धन पाटील.
मेटे बंधूंची हॉटेलची ही दुसरी शाखा आहे. लवकरच यांची तिसरी शाखा होईल - हर्षवर्धन पाटील.
इंदापूर:- जो माणूस मेहनती असतो. ज्या माणसाला व्यवसाय आणि काम करण्याची जिद्द असते. तीच माणसं आयुष्यामध्ये पुढे जातात आणि मला विश्वास आहे. आज मेटे परिवार या पुढच्या काळामध्ये निश्चित पणाने पुढे जाईल असे गौरउद्गार राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर येथील हॉटेल मेटे बंधू यांच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी बोलताना व्यक्त केले.
या कार्यक्रमाप्रसंगी पै. पिंटू काळे
मेघशाम पाटील, संजय पाटील,
देविदास वीर, दादासाहेब घोगरे, कुबेर पवार, कैलास कदम, राजाभाऊ इंगळे.अमोलराजे इंगळे ,शेखर पाटील, हर्षल पाटील, अंकुश आप्पा, प्रशांत पाटील भिमानगर, रमेश पाटील, भारत खूपसे. संतोष मोरे, सोमनाथ फलफले,, अशोक कदम ,सुभाष काळे,गोपीचंद गलांडे, शांतीलाल शिंदे, तुषार खराडे, सचिन देशमुख, तुकाराम डोके, , लालासाहेब सिद ,साहेबराव घोगरे, प्रा. दशरथ घोगरे ,प्रा. प्रकाश घोगरे, बाळासाहेब घोगरे,शिवाजी कोकाटे ,अण्णासाहेब नागणे ,सदाशिव यादव , संजय फरड ,केशव तळेकर, सचिन जाधव , गणेश फरड, तुषार कदम,महेश पाटील, तेजस नवले, महादेव कोल्हे, प्रशांत काळे,हेमंत घोगरे, गणेश बोंगणे, समता शहा व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले की,इंदापूर तालुक्याच्या शिक्षण मंडळाच्या कॅम्पसमध्ये स्वर्गीय शंकरराव पाटील यांनी जे व्यावसायिक गाळे बांधले त्यामुळे चांगला व्यवसाय करण्याची संधी आज तरुणांना मिळते. आणि याच कॅम्पसमध्ये मेटे बंधू यांनी हॉटेल व्यवसाय चालू केला त्याचे उद्घाटन सर्वांच्या साक्षीने झाले असे उद्गार माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी केले.
तसेच ते पुढे म्हणाले की, या उभा केलेल्या हॉटेलमध्ये कमी जागेत आकर्षक पद्धतीने डिझाईन करून उत्तम प्रकारची सेवा देण्याचे काम व महाराष्ट्र व साउथ इंडियन पदार्थ उत्तम प्रकारचे त्यांनी वाजवी दरात उपलब्ध करून दिले आहेत. कॉलेज कॅम्पस असल्यामुळे सात ते आठ हजार विद्यार्थी इंदापूर तालुका तसेच माढा तालुक्यातील विद्यार्थी या ठिकाणी येतात. त्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचे हॉटेल या ठिकाणी उपलब्ध झाले त्याचा आनंद आहे. त्यामुळे तुमच्या या कार्यास शुभेच्छा देऊन पाटील यांनी मेटे कुटुंबाचे अभिनंदन केले. तसेच ते नातेसंबंधाबद्दल बोलताना म्हणाले की, मेटे परिवार आणि सुरवडचे घोगरे यांचे नाते जवळचे आहे. त्यामुळे ही सर्व माणसं जीवाभावाची व नात्यागोत्यातील आहे. प्रेम संबंधातील माणसे आहेत. कुठलाही व्यवसाय करायचे म्हटले तर रात्रीत श्रीमंत होण्याची स्वप्ने बघू नका. कुठल्याही कामात आणि व्यवसायात सातत्य ,
प्रामाणिकपणा , सचोटी , क्वालिटी ठेवा आणि सेवा देण्याचं काम करा . ग्राहक हे आपले दैवत आहे म्हणून ग्राहकाशी बोलताना , वागताना आपल्याकडे एवढी नम्रता पाहिजे की त्या नम्रतेवर सुद्धा आपलं हॉटेल चांगल्या पद्धतीने चालू शकत. व्यवसाय करायचं म्हटलं तर आपला व्यवसाय त्यावरतीच अवलंबून आहे . हे डोक्यामध्ये ठेवून आपण काम केलं पहिजे .मला वाटतं ही दुसरी शाखा आहे. लवकरच यांची तिसरी शाखा होईल याबद्दल शंका नाही. एका गोष्टीचा मला खूप आनंद वाटला या ठिकाणी सर्व तरुण उद्योजकांचा सत्कार केला.
मेटे कुटुंबीयांचे मुळगाव उजनी आहे. मेटे कुटुंबीयांचा स्वभाव प्रेमळ असल्यामुळे या कार्यक्रमास भरपूर लोक हजर आहेत. हे कशाचे प्रतीक आहे तर आपला स्वभाव जर प्रेमळ असेल. आपलं समाजातलं वागणं चांगलं असेल. समाजामध्ये आपली वेगळ्या पद्धतीने प्रतिमा ठेवली तर समाज आपल्या मागं कायम येतो. उदाहरण आमच्या या मेटे कुटुंबीयांच्यातून पाहायला मिळते म्हणून ते शेतीचा व्यवसाय चांगला करतात. तिन्ही भाऊ त्यांचं एकमेकांना चांगलं सहकार्य आहे. कष्ट करत आहेत आणि रात्रंदिवस मेहनत घेण्याची तयारी आहे. मी आपणाला एवढं सांगणार आहे मेहनतीशिवाय काय मिळत नाही . कष्ट केल्याशिवाय काय मिळणार नाही म्हणून जो माणूस मेहनती असतो. ज्या माणसाला व्यवसाय आणि काम करण्याची जिद्द असते. तीच माणसं आयुष्यामध्ये पुढे जातात आणि मला विश्वास आहे. आज मेटे परिवार या पुढच्या काळामध्ये निश्चित पणाने पुढे जाईल त्यांना एवढेच सांगणार आहे. जिथे जिथे आम्ही उद्घाटन करतो तिथं आमचा हात काय वाईट नाही प्रगती होतेच कारण सांगण्याचा उद्देश असा आहे की ,आपलं काम आहे. तरुण पिढींना उत्तम मार्गदर्शन करणे . योग्य सल्ला देणे. त्यांना योग्य पद्धतीने प्रवाह मध्ये आणणे. त्यांना चांगल्या प्रकारचे संस्कार घडवणे .ती समाजाची गरज आहे .नाहीतर तरुण पिढी ला योग्य मार्गदर्शन झालं नाही. तर आपण पाहतो की कशा पद्धतीने घटना घडतात. सुदैवाने आपल्याकडे तसे प्रकार घडत नाहीत. खूप चांगलं वातावरण आपण या ठिकाणी केलेले आहे. अशा पद्धतीने राष्ट्रीय सहकार साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी उद्घाटना प्रसंगी मार्गदर्शन करताना आपले मत व्यक्त केले.
या कार्यक्रमा प्रसंगी सर्व युवा उद्योजकांचे सत्कार माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हस्ते करण्यात आले .
कार्यक्रमाचे आयोजन संतोष मेटे, अनिल मेटे व मित्र परिवार यांनी केले तर आभार अमरजीत मेटे यांनी मानले.