इंदापूर :- दिनांक १५/४/२०२४ रोजी जिल्हा परिषद प्राथ शाळा गौराईमळा शेळगाव या ठिकाणी इयत्ता पहिली प्रवेशोत्सव ,इयत्ता चौथी निरोप समारंभ व सत्कार सोहळा व शेळगाव केंद्राचे केंद्र प्रमुख मारुती सुपुते साहेब यांचा सेवा निवृत्ती कार्यक्रम संपन्न झाला.प्रथम भारतरत्न डॅा.बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसु्र्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करुन कार्यक्रमाची सुरुवात केली.या कार्यक्रमासाठी शेळगाव केंद्राचे केंद्र प्रमुख सन्मान सुपुते साहेबांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की ,जिल्हा परिषद शाळा म्हणजे आपल्या जीवनात जे संस्कार घडतात त्याचे माहेर घरच असते.अशा शाळेत विद्यार्थ्यांचा बौद्धीक, शारिरीक व मानसिक विकास घडवण्याचे कार्य या शाळेत घडत असते त्यामुळे इतर शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषद शाळेत गुणवत्ता पुर्ण शिक्षण मिळुन आदर्श शाळा म्हणुन नावारुपाला येत आहेत.या वेळी आदर्श जिल्हा पुरस्कार प्राप्त केंद्र प्रमुख सुपुते साहेब यांचा फोटो फ्रेम पुष्पगुच्छ देऊन शाळेच्या वतीने शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.
या वेळी इयत्ता १ लीत दाखल होणाऱ्या मुलांचे स्वागत करुन शासन निर्णया प्रमाणे सात टेबल वर सात क्षेत्राची मांडणी करुन त्यातील प्रत्येक क्षेत्राची शालापूर्व तयारी कशी करून घ्यावी याची मुलाला व आई, माता गटाला ओळख करुन दिली तसेच इयत्ता ४ थीतील मुलांचे भविष्यातील शिक्षणा विषय मार्गदर्शन शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य अरुण जाधव सर यांनी केले .
या वेळी भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने या शैक्षणिक वर्षातील १ ते ४ मधील विद्यार्थ्यांना शालेय दप्तर वाटप करण्याची घोषणा सन्मान शामरावजी जाधव यांनी केली .
या वेळी तंटामुक्तीचे अध्यक्ष तात्यासाहेब शिंगाडे ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोलजी नाझरकर ,मनिषा शिंगाडे शेळगाव ग्रामपंचायत समितीच्या उपसरपंच रेश्माताई जाधव यांनी आपली मनोगत व्यक्त केली .
इयत्ता पहिलीतील मुलांचा प्रवेश पाटी व गुलाब पुष्प देऊन करण्यात आला सर्व सन्माननिय उपस्थिताना व मुलांना जेवणाची सोय करण्यात आली होती.या कार्यक्रमाची प्रस्तावना व सुत्रसंचालन मुख्याध्यापक प्रताप शिरसट सरांनी केली .
या कार्यक्रमावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे उपा ध्यक्ष अमोल जाधव, अनिल शिंगाडे, श्रावणकुमार जाधव ,मल्हारी जाधव, पदमराज जाधव,रविंद्र होले, वंदना शिंगाडे, सारिका शिंगाडे,मनिषा जाधव, प्रियांका जाधव , मनिषा शिंगाडे,आधी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .शेवटी उपक्रमशील शिक्षिका जुबेदा पठाण मॅडम यांनी आभार मानून कार्यक्रमांची सांगता केली.