तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना मिळाले आता नवीन फोर जी,अॅण्ड्रॉईड ई पॉझ मशीन
श्रीरामपूर प्रतिनिधी:
श्रीरामपूर तालुक्यातील सरकार मान्य स्वस्त धान्य दुकानदारांकडून वितरीत होणारी प्रणाली आता कात टाकणार आहे. धान्य दुकानदार संघटनेच्या राज्य जिल्हा संघटनांनी वेळोवेळी ईपॉझ मशीन जुने झालेत,नेटवर्क धरत नाही, मशीन व्यावस्थीत चालत नाही अशा विविध तक्रारी करत नवीन अॅण्ड्राईड, फोर जी ई पॉझ मशीन मिळावी अशी मागणी करत सततच्या पाठपुराव्यास राज्य सरकार कडून प्रतिसाद मिळत श्रीरामपूर तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना नुकतेच नवीन 4 जी ई पॉझ मशीन चे वितरण नुकतेच करण्यात आले आहे.
सन २०१३ पासून नवीन प्रणाली नुसार ई पॉझ मशीनला थम्स दिल्या शिवाय वितरण होत नाही म्हणजेच केवळ ऑनलाईन वितरण सुरू झाले, त्यामुळे तक्रारींची टक्केवारी जवळजवळ संपली अन् वितरण प्रणाली सुधारल्याने सर्वत्र शिधापत्रिका धारकांत समाधान व्यक्त होत असतानाच दुकानदारांना दिले गेलेले जुने टु जी ई पॉझ मशीनमध्ये बिघाड झाल्यानंतर त्यांचे पार्ट उपलब्ध होत नव्हते, अनेकदा सर्व्हअर डावून होत असे, बॅटरी पॉवर टिकत नव्हते अशा अनंत अडचणींना दुकानदार तोंड देत ही यंत्रणा सुरू होती.
धान्य दुकानदार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष गणपतराव डोळसे, प्रदेश सचीव बाबुराव म्हमाणे, जिल्हाध्यक्ष देवीदास देसाई, जिल्हा सचिव रज्जाक पठाण आदिंसह सर्व पदाधिकार्यांनी अनेकदा मंत्रालयात, सचीवालयात तर प्रसंगी राज्याचे पुरवठा मंत्री ना. छगनराव भुजबळ यांचेपर्यंत मागणी करत पाठपुरावा केला, त्यास राज्य सरकारकडून प्रतिसाद मिळला अन् श्रीरामपूर तालुक्यातील ११० सरकार मान्य स्वस्त धान्य दुकानदारांना नुकतेच जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बडे, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी मिनाक्षी चौधरी, श्रीरामपूरचे उपविभागीय अधिकारी किरण सावंत पाटील व श्रीरामपूरचे तहसिलदार मिलींकुमार वाघ यांचे मार्गदर्शनाखाली नुकतेच श्रीरामपूर तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना नवीन अॅण्ड्राईड व फोर जी ई पॉझ मशीनचे वितरण करण्यात आले. त्याचबरोबर सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना हे मशीन हाताळणी व वापराचे प्रशिक्षणही नुकतेच श्रीरामपूर तहसिल कार्यालय येथे संपन्न झाले.
यावेळी तहसिलदार मिलींदकुमार वाघ व पुरवठा नायब तहसिलदार सुनिता धिमते यांचे मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसिलदार राजेंद्र वाक्चौरे, निवडणुक नायब तहसिलदार हेमलता वाकडे, पुरवठा निरीक्षक सुहास पुजारी,अव्वल कारकुन नितीन गरगडे, क्लर्क योगेश खंडागळे आदिंचे हस्ते व उपस्थितीत हे नवीन पॉझ मशीन श्रीरामपूर तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना वितरण करण्यात आले तर ओअॅसिस सॉप्टवेअर्स जिल्हा समन्वयक गणेश दिघे यांचे मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर तालुक्याचे समन्वयक सागर पानसरे यांनी उपस्थित स्वस्त धान्य दुकानदारांना प्रशिक्षण दिले. त्यांना नेवासा तालुक्याचे समन्वयक भुषण शिरोदे व राहुरी तालुक्याचे समन्वयक वसीम शेख यांनी सहकार्य केले.
यावेळी संघटनेचे जिल्हा सचिव रज्जाक पठाण, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख चंद्रकांत झुरंगे, तालुकाध्यक्ष बजरंग दरंदले, माणीक जाधव, लालमोहमद जहागीरदार, सुभाष चोरडीया, दिलीप गायके, विकी धाकतोडे, भाऊसाहेब वाघमारे, गणेश चव्हाण, बाळासाहेब राठोड, अनिल मानधना, सचीन मानधना, मुरली वधवाणी, एकनाथ थोरात, सुधीर गवारे,अजीज शेख, जाकीर शेख, उमेश दरंदले, दादा मैराळ, बाळासाहेब कांगुणे, धनंजय झिरंगे, सुधीर गवारे, सद्दाम शेख, किशोर छतवाणी, योगेश नागले, योगेश गंगवाल, कैलास भणगे, राजेंद्र शिंदे, बबन नागले, देवराम गाढे, सौरभ खरात, विकी धाकतोडे आदिंसह तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार उपस्थीत होते.
*लोकसभा निवडणुकी दरम्यान प्रशासनाला सहकार्य करा - हेमलता बडे*
यावेळी निवडणुक नायब तहसिलदार हेमलता बडे यांनी लोकसभा निवडणुकी दरम्यान कुठल्याची मतदान केंद्रावर किंवा बाहेर काही अडचण आल्यास, जास्तीत जास्त मतदान होणेकामी समाजास प्रवृत्त करणे कामी तसेच पैसे किंवा इतर अमिष दाखवून मतदान होत असल्यास तातडीने संपर्क साधण्यासाठी त्याच बरोबर कुठल्याही अडचणीच्या काळात प्रशासनाकडून संपर्क झाल्यास त्या परीसरातील ग्रामसेवक, स्वस्त धान्य दुकानदार, आशा सेविका यांनी योग्य प्रतिसाद देवून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.
श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वाडगांव येथील स्वस्त धान्य दुकानदार गणेश चव्हाण यांना नवीन फोर जी ई पॉझ मशीन प्रदान करताना नायब तहसिलदार राजेंद्र वाक्चौरे समवेत हेमलता बडे, सुहास पुजारी, सागर पानसरे,भुषण शिरोदे, वसीम शेख आदि दिसत आहेत.
(छाया - चंद्रकांत झुरंगे, भोकर)
अशा प्रकारचे नवीन अॅण्ड्रॉईड फोर जी ई पॉझ मशीन आहे
अशा प्रकारचे नवीन अॅण्ड्रॉईड फोर जी ई पॉझ मशीन तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना वितरीत करण्यात आले.
(छाया- चंद्रकांत झुरंगे- भोकर)
*पत्रकार चंद्रकांत झुरंगे - भोकर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111