*श्रीराज भरणे यांच्या संकल्पनेतून होतकरू तरूणांसाठी उपलब्ध होताहेत रोजगाराच्या संधी*
इंदापूर:- माजी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांचे सुपुत्र श्रीराज भरणे यांच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यातील होतकरू तरुणांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असून अनेक गरजू युवक या संधीचा फायदा घेत आहेत.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून आमदार दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली व श्रीराज भरणे यांच्या संकल्पनेतून तसेच इंदापूर येथील शौर्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून ग्रामीण भागातील होतकरू व गरजू तरुणांना वेगवेगळ्या रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत या भावनेतून गेल्या दोन-चार वर्षापासून या उपक्रमाचे आयोजन केले जात आहे.
याच धरतीवर ऑटोमोबाईल प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या युवकांनी आज आमदार दत्तात्रय भरणे व श्रीराज भरणे यांची भेट घेऊन आभार मानले.यावेळी बोलताना आमदार दत्तात्रय भरणे म्हणाले,की शहरी भागातील मुलांच्या बरोबरीने आपल्या ग्रामीण भागातील मुलांची सुद्धा गुणवत्ता असते मात्र त्यांना शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रशिक्षण न मिळाल्यामुळे क्षमता असूनही अशा मुलांना चांगल्या प्रकारच्या संधी उपलब्ध होत नाहीत.त्यामुळे युवकांची ही अडचण लक्षात घेऊन शौर्य प्रतिष्ठान आणि SKF व TATA STRIVE कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये उत्तम करिअर करण्यासाठी या क्षेत्रामध्ये येऊ पाहणाऱ्या नवतरुणांना टू व्हीलर फोर व्हीलर ऑटोमोबाईल सर्विस आणि टेक्निशियन या कोर्सचे मोफत प्रशिक्षण दिले जात असून हे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या तरुणांना ऑटोमोबाईल कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळत असल्याचे सांगून आमदार भरणे पुढे म्हणाले की,आपल्या आई-वडिलांनी काबाडकष्ट करून आपल्याला शिक्षण देण्याचे काम केले आहे.त्यामुळे आई-वडिलांच्या कष्टाची जाण मनामध्ये ठेवून या कोर्ससाठी निवड झालेल्याा तरुणांनी प्रामाणिकपणे प्रशिक्षण घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
तसेच युवा नेते श्रीरज भरणेे म्हणाले की आपल्या तालुक्यातील होतकरू तरुणांना वेगवेगळ्या ठिकाणी जॉब उपलब्ध होण्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करत असून आजच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये फक्त पुस्तकी ज्ञानाला महत्व न देता तरुणांनी वेगवेगळी कौशल्ये,तंत्रज्ञान अवगत केली पाहिजेत,जेणेकरून याचा फायदा आपल्याला नोकरी मिळविण्यासाठी होईल.याच भावनेतून आपण अशा प्रकारची वेगवेगळी प्रशिक्षण शिबिरे घेत असून यामध्ये आपल्या तालुक्यातील गरजु युवकांना पुणे येथे तीन महिने अगदी निशुल्क हे प्रशिक्षण मिळणार असुन या प्रशिक्षण दरम्यान युवकांना पुण्याला जाण्यापासून ते अगदी त्यांच्या राहण्या- खाण्या पर्यंतचा सर्व खर्च आमदार दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याची माहिती श्रीराज भरणे यांनी दिली.तसेच भविष्यात सुद्धा अशा प्रकारचे वेगवेगळे उपक्रम राबविणार असल्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.यावेळी आमदार दत्तात्रय भरणे यांच्यासह श्रीराज भरणे,शौर्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल गुंडेकर, प्रतीक झोळ,अजिंक्य बंगाळे,कुमार शिंदे,प्रशांत चेंडके,प्रज्वल गायकवाड,ऋषी काळे आदी प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते.