shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक - २०२४ छाप्यात जप्त करण्यात आलेली रक्कम आयकर विभागाच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे सुपूर्द


अहमदनगर जि.मा.का.वृत्तसेवा:
स्थानिक गुन्हा शाखेने अहमदनगर शहरामध्ये छापा मारुन ७३ लक्ष २४ हजार ५०० रुपयांची रक्कम जप्त केली होती. यापैकी ६९ लक्ष ४४ हजार ५०० रुपये एवढ्या रक्कमेचे योग्य स्पष्टीकरणे न मिळाल्याने ही रक्कम आयकर विभागाने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आली असुन उर्वरित ३ लक्ष ८० हजार रुपयांची रक्कम योग्य स्पष्टीकरण मिळाल्याने कृष्णा विजय भगत, बोल्हेगाव यांना सुपूर्द करण्यात आली असल्याची माहिती मुख्य लेखा वित्त अधिकारी तथा खर्च सनियंत्रण कक्षाचे नोडल अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. 

(संग्रहित छायाचित्र)

  लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार अहमदनगर शहरामध्ये २१ मार्च २०२४ रोजी छापा टाकुन रक्कम जप्त करण्यात आली होती. जिल्हा तक्रार निवारण समितीने आयकर विभागाला चौकशी करुन अहवाल सादर करण्याच्या सुचना दिल्या होत्या. आयकर विभागाने दिलेल्या अहवालानुसार ही कार्यवाही करण्यात आली असल्याचेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111


close