श्रीरामपूर : -
वर्ल्ड कॉन्स्टीट्यूशन अँड पार्लमेंट असोशिएशन ( डब्ल्यूसीपीए ) अर्थात जागतिक संविधान व संसद संघातर्फे नेहमीप्रमाणे समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला आणि पुरुषांसाठी विविध सन्मान योजना राबविल्या जातात. त्याच मालिके अंतर्गत " जागतिक पर्यावरण दिनानिमित्त " पर्यावरण क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य करणाऱ्यांसाठी
" वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल क्लायमेट एमिझरी अवॉर्ड २०२४ " आणि जिगरबाज पुरुषांसाठी
" वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल अवॉर्ड २०२४ "
देऊन गौरविण्यात येणार आहे. तरी त्यासाठी इच्छुक व पात्र असणाऱ्या गुणवान स्त्री -पुरूषांनी आपले प्रस्ताव नवीन ऑफिसिएल पासपोर्ट फोटोसह पाठवावेत. त्यासाठी इमेल आयडी -wcpashrirampur@gmail.com आणि
संपर्कासाठी मोबाईल - ९०९६३७२०८२ हा आहे.
तरी पात्र व्यक्तींनी १५ एप्रिल २०२४ पर्यंत आपली पूर्तता करावी.
तसेच ही माहिती लवकरात लवकर आपल्या निकटवर्तीयांना, सोशल मिडीया समुदायाला आणि इतरांना फॉरवर्ड करावी.
सदर पुरस्कारात मानपत्र, सन्मानचिन्ह व इतरही मौल्यवान बाबी मान्यवरांच्या हस्ते एका रंगारंग व अविस्मरणीय कार्यक्रमात देण्यात येणार आहे. प्रस्ताव पाठविण्यापूर्वी सोबत दिलेल्या क्रमांकावर संपर्क करणे अनिवार्य आहे याची कृपया नोंद घ्यावी. असे आवाहन डब्ल्यूसीपीएच्या महाराष्ट्र चॅप्टरचे अध्यक्ष डॉ. दत्ता.विघावे यांनी केले आहे.