श्रीरामपूर प्रतिनिधी:
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर तालुक्यातील शिरसगांव महादेव मंदिर विठ्ठल मंदिर या ठिकाणी शिरसगाव तंटामुक्तीचे अध्यक्ष अशोकराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली महादेव यात्रा कमिटीची बैठक संपन्न झाली. गावातील महादेव यात्रा उत्सव आगळावेगळा साजरा करावा अशी भूमिका सर्व तरुण सहकार्याने मांडली, बैठकीतील चर्चेतून गावात बंद पडलेली कुस्त्यांची परंपरा पुन्हा सुरू करण्याचे ठरले , मंगळवार दिनांक ३० एप्रिल रोजी गोंधवणी रोड मित्रमंडळाच्या वतीने मानाच्या झेंड्याची सवाद्य मिरवणूक तसेच संध्याकाळी साडेनऊ वाजता महादेव मंदिरावर फेटा चढवण्याचा कार्यक्रम होणार आहे व १ मे रोजी गावात कुस्त्यांचा जंगी हंगामा होणार आहे २१०००/- रुपयाची मानाची कुस्ती होणार आहे, ११००० व ५००० कुस्ती होणार आहे , तसेच मानाच्या इतरही कुस्त्या होणार आहेत तरी यावेळी होणाऱ्या यात्रा उत्सवात सर्व गावकऱ्यांनी सहभागी व्हावे जिल्ह्यातील नामवंत मल्लांनी हजेरी लावावी असे आवाहन संजय गांधी निराधार समितीचे तालुका अध्यक्ष गणेशराव मुद्गुले यांनी केले आहे.
यावेळी सर्वानुमते महादेव मंदिर यात्रा कमिटीचे अध्यक्षपदी नितीन गवारे उपाध्यक्षपदी अनिल बढे खजिनदारपदी गणेश वाघ यांची निवड केली.तसेच राजेंद्र गजानन गवारे, सुरेश मुदुगुले सचिन ज्ञानदेव गवारे राजेश यादव अमोल जाधव दत्तात्रय पवार सनी बिलवरे शुभम ताके यांची सदस्यपदी निवड करण्यात आली. यावेळी महादेव मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष फकीरचंद बकाल .बापूसाहेब काळे चेअरमन शिवाजी गवारे , सुरेश ताके कचरू बढे ,सरपंच राणीताई संदीप वाघमारे, उपसरपंच संजय यादव व सर्व ग्रामपंचत सदस्य तसेच लक्ष्मण यादव कडू पवार मुळेगुरु भागचंद जगताप,भास्कर ताके, सिताराम धनाड पाराजी ताके, गीताराम जाधव बाळासाहेब बकाल, बाळासाहेब दगडू गवारे, सुभाष गवारे , ज्ञानदेव गवारे , नंदू यादव बाबासाहेब यादव शरद दिवटे ,मनोज बर्वे दत्ता जाधव निलेश यादव संदीप वाघमारे, बाळासाहेब लांडगे, प्रसाद सातूरे, अशोकराव रासकर, केदार यादव, मुन्ना यादव ,रंगनाथ ताके.आदी उपस्थित होते.
कुस्त्यामध्ये सहभागी होणाऱ्या मल्लांनी गणेश वाघ मो.नं 8087448891 गणेश जपे 7972141129 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन ही करण्यात आले आहे.
*ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111