श्रीरामपूर प्रतिनिधी:
रमजान महिना हा मुस्लिम बांधवांचा पविञ महिना आहे. या महिन्यात सामाजिक एकोपा निर्माण होण्याकरिता इफ्तार पार्टीचे आयोजन केले जाते. त्यामुळे समाजातील एकमेकांच्या सुख-दुःखात सामील होता येते. अशा प्रकारचे कार्यक्रम झाल्यास देशामध्ये धार्मिक व सामाजिक सलोखा आणि शांतता अबाधित राहील, असे प्रतिपादन अशोक सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी केले.
जामा मस्जिद, श्रीरामपूर येथे लोकसेवा विकास आघाडी आयोजित इफ्तार पार्टी प्रसंगी माजी आ.श्री.मुरकुटे बोलत होते. सध्या मुस्लीम धर्मियांचा पवित्र रमजान महिना सुरू असून या महिन्यात मुस्लीम बांधव पहाटे लवकर उठून रोजा (उपवास) धरतात. सायंकाळी हा रोजा सोडला जातो. त्यास इफ्तार असे म्हणतात. त्यात अशा इफ्तार पार्टीमुळे दोन्ही समाजामध्ये एकोपा व जातीय सलोखा टिकण्यास मदत होईल. सामाजिक सलोखा आणि एकात्मतेसाठी सर्व समाजातील लोक एकत्र येणे आवश्यक आहे. सर्व धर्मांमध्ये समानतेची जाणीव निर्माण करून आपापसांतील बंधुभाव वाढवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन होणेसुद्धा महत्त्वाचे आहे. यावेळी जामा मस्जिदचे खतीबू इमाम हजरत मौलाना इमदाद अली, मोहम्मद तन्वीर रजा, मौलाना शहानुर, हाफिज मुस्लीम, हाफिज वजहूल कमर आदीचे सत्कार करण्यात आले.
यावेळी अशोक बँकेचे चेअरमन ॲड.सुभाष चौधरी, लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष हिम्मतराव धुमाळ, अशोक कारखान्याचे व्हा.चेअरमन पुंजाहरी शिंदे, शहराध्यक्ष नाना पाटील, मुळा प्रवराचे संचालक सिध्दार्थ मुरकुटे, माजी नगरसेवक मुख्तार शाह, कलीम कुरेशी, रियाज पठाण, रज्जाक पठाण, रफिक बागवान, आशिष दोंड, डॉ.राज शेख, अकिल सुन्नाभाई शेख, शरीफ मेमन, तौफिक शेख, गणेश छल्लारे, रफिक बागवान, मुनीर शेख, मुश्ताक शेख, प्रवीण फरगडे, अमोल कोलते, नवाब सय्यद, जमशेद पटेल, इसाक पटेल, रशीद कुरेशी, हेमंत दहिवाळ, साहेबराव गायकवाड, कैलास भागवत, विठ्ठल गांगुर्डे, अंबादास पवार, शाहरुख काझी आदींनी या इफ्तार पार्टीला उपस्थित राहून मुस्लिम बांधवाना पवित्र रमजान महिन्याच्या व येणाऱ्या रमजान ईदच्या खास शुभेच्छा दिल्या.
*पत्रकार अफजल मेमन - श्रीरामपूर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111