shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

काचोळे विद्यालयाची एन. एम. एम. एस. परीक्षेत उत्तुंग भरारी; २९ विदयार्थी शिष्यवृत्ती पात्र, विद्यालयाने पटकावली १२ लाखाची शिष्यवृत्ती


श्रीरामपूर प्रतिनिधी:
महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या एन. एम. एम. एस. परीक्षेत श्रीरामपूर येथील रयत शिक्षण संस्थेचे, डी. डी. काचोळे माध्यमिक विद्यालयाने नेत्रदीपक यश संपादन करून उत्तुंग भरारी मारली आहे. विद्यालयाचे २९ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले. यामध्ये धैर्यशील प्रदीप भांड, कार्तिक पराग भोसले, अपूर्वा संतोष आढाव, प्रांजल कृणाल भोसले, इजान सलीम तांबोळी, अथर्व रामनाथ गाडेकर, यशवंत आप्पासाहेब चाबुकस्वार, हरीश विनायक बोरुडे या विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान पटकावले. त्यांना दरवर्षी महाराष्ट्र शासनातर्फे १२ हजार रुपये अशी एकूण चार वर्षे प्रत्येकी ४८ हजार रुपये पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळणार आहे. 

    तसेच विद्यालयाचे विद्यार्थी सारथी शिष्यवृत्ती साठी पात्र झाले. यामध्ये ईश्वरी विजय गोर्डे, प्रणाली अविनाश पवार, श्रद्धा जगदीश लांडे, ओमकार कुंडलिक फरगडे, आदित्य प्रशांत वीर, दीप्ती प्रल्हाद खालकर, विद्या प्रकाश मेघळे, यश भगवंत बोंबले, साहिल ज्ञानेश्वर गाडेकर, ज्ञानेश्वरी चंद्रकांत नळे, कृष्णा संदीप गवारे, यश पोपट कणसे, साजिरी रणजीत टाके, अभिमन्यू किरण बडाख, साईराज कृष्णा पवार, सिद्धी कैलास बनकर, संभाजी बद्रीनाथ आढाव, ईश्वरी अमोल कडू, दिव्यता वाल्मीक गवारे, समर्थ तुळशीदास भोसले, दिव्या प्रदीप तिडके इत्यादी विद्यार्थी सारथी शिष्यवृत्तीस पात्र ठरले.
    यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनिल साळवे, पर्यवेक्षक बाळासाहेब रासकर, विभाग प्रमुख सोपान नन्नावरे, निलिमा गेडाम विषय शिक्षक स्नेहा निंबाळकर, मनिषा घावटे, रीना जोशी, विपुल गागरे, सुनिल खाडे, यांचे मार्गदर्शन लाभले.
       रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्या मीनाताई जगधने, जनरल बॉडी सदस्य प्रकाश निकम पाटील, उत्तर विभागीय अध्यक्ष आ.आशुतोष काळे, विभागीय अधिकारी नवनाथ बोडके, सहाय्यक विभागीय अधिकारी प्रमोद तोरणे व बाबासाहेब नाईकवाडी, विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनिल साळवे, पर्यवेक्षक बाळासाहेब रासकर, विद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यालयाच्या या नेत्र दीपक यशाबद्दल पालक वर्ग व समाजातील सामाजिक संस्था यांच्याकडून कौतुक व समाधान व्यक्त केले जात आहे.

*पत्रकार अफजल मेमन,श्रीरामपूर* 
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close