shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

सत्कार्यामुळे माणूसच माणसांचं जग सुखी करतो - प्राचार्य टी.ई. शेळके


श्रीरामपूर प्रतिनिधी:
सत्कार्य करीत राहणे ही मानवी संस्कृती आहे. हे जग अशा सत्कार्य करणाऱ्या माणसामुळे प्रगती पथावर आहे. माणूसच माणसाला आपल्या सत्कर्मातून सुखी करतो ही भूमिका असली पाहिजे असे विचार स्नेह परिवार ग्रुपचे संस्थापक,अध्यक्ष माजी प्राचार्य टी.ई. शेळके यांनी व्यक्त केले.

  भूमी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य या सेवाभावी संस्थेतर्फे प्राचार्य टी.ई. शेळके यांच्या स्नेहपरिवार ग्रुपची स्थापना आणि उपक्रमाविषयी भूमी फाऊंडेशनचे संस्थापक,अध्यक्ष प्रा.कैलास पवार यांनी सत्कार केला, त्याप्रसंगी प्राचार्य शेळके बोलत होते. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे सेवानिवृत्त मॅनेजिंग कौन्सिल सदस्य,ज्येष्ठ साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये, विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे संस्थापक, सचिव सुखदेव सुकळे,भूमी फाऊंडेशन च्या सचिव सौ. अनिता पवार, सौ. चेडे, बाबासाहेब चेडे आदिंनी प्राचार्य शेळके यांचा सत्कार केला. प्राचार्य शेळके यांनी प्रा. कैलास पवार यांचे महांकाळवाडगाव येथील जलसंवर्धन, सामाजिक कार्य, महिला सबलीकरण उपक्रम, पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन या प्रारंभिक कार्याचे कौतुक करून ही संस्था आता राज्यभर लोकसेवा करीत असल्याचे सांगून कोरोना काळ, नैसर्गिक संकटे यामधील कार्याचे मोठेपण सांगून वाघोली येथे सावित्रीबाई नावाने उभारलेले भव्य वसतिगृह आणि शंभर निराधार मुलांचा सेवाश्रम या कार्याचे कौतुक केले. सुखदेव सुकळे यांनी प्रा. कैलास पवार व सौ. अनिता पवार यांना देशहितवादी ग्रंथ, बुके,शाल देऊन सत्कार केला, प्रा.डॉ बाबुराव उपाध्ये यांनी' नरवीर प्रकाशनची कॅलेंडर प्रकाशनात्मक वितरण करून सर्वाचा सत्कार केला. प्रा. केलास पवार यांनी आपल्या कार्याची माहिती देऊन निराश्रित, एकल महिला मुले यांच्यासाठी उभारलेल्या वसतिगृहाची माहिती दिली.०१ मे रोजी होणाऱ्या भव्य वसतिगृह उद्घाटन प्रसंगी चौथे मराठी साहित्य संमेलन होत असल्याची माहिती देऊन साहित्यिक, वाचकांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले. सूत्रसंचालन डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी केले तर पत्रकार बाबासाहेब चेडे यांनी आभार मानले.


*ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close