श्रीरामपूर प्रतिनिधी:
श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची तीथीप्रमाणेची शिवजयंती पारंपारीक वाद्याच्या संगतीने व विविध जाती धर्माच्या बांधवांनी सहभाग नोंदवत मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यावेळी निघालेल्या मिरवणूकीत येथील मुस्लीम बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत जातीय सलोखा राखल्याने सर्वत्र समाधान व्यक्त होताना दिसत आहे.
भोकर येथे विविध जाती धर्माचे बंधन तोडून सर्व समाजाचे बांधव एकत्र येवून सर्व महापुरूषांच्या जयंती, पुण्यतिथी उत्साहात साजरी करतात. याचेच प्रतिक म्हणून भोकर येथे नुकत्याच संपन्न झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे तीथीप्रमाणेची शिवजयंती उत्सव होय. येथील तरूणांनी एकत्र येत येथील श्रीक्षेत्र रेणुकामाता मंदिराजवळील जयभवानी चौक येथील भव्य भगव्या ध्वजाजवळ छत्रपतींच्या अर्ध पुतळ्याचे पुजन येथील जेष्ठ मार्गदर्शक भिकाजी पोखरकर, सोसायटीचे चेअरमन आण्णासाहेब काळे व युवा नेते महेश पटारे यांचेसह अनेक मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.
त्याच प्रमाणे श्रीरामपूर-नेवासा राज्यमार्ग येथून बॅण्ड पथकाच्या सवाद्य मिरवणूकीस आरंभ झाला. यावेळी अनेकांनी भगवे फेटे परीधान करत या उत्सवात उत्साहाने सहभागी झाल्याचे दिसत होते. चौकाचौकात या मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले. त्यात याच मार्गावर मुन्वर शेख, रफीक शेख व रशीद शेख आदि मुस्लीम बांधवांनी छत्रपतीचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून रयतेच्या राजांना विनम्र अभिवादन केले तर संदिप अमोलीक यांनी रिपाई व भिमशक्तीचे वतीने तसेच आहील्यादेवी होळकर मित्र मंडळाचे वतीने सुनिल वाकडे यांनी तर सावता परीषदेच्यावतीने राहुल अभंग आदिंनी राजेंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. त्यानंतर येथील जयभवानी चौक येथे शांततेत पण उत्साहपुर्ण वातावरणात संपन्न झालेल्या मिरवणुकीचे विसर्जन करण्यात आले.
यावेळी सोसायटीचे चेअरमन आण्णासाहेब काळे, सरपंच पती प्रताप पटारे, उपसरपंच सागर आहेर, माजी उपसरपंच राजेन्द्र चौधरी, ग्रामपंचायत सदस्य गिरीश मते, ज्ञानेश्वर काळे, दिलीप पटारे, सुनील वाकडे, राहूल अभंग, सेनेचे विभाग प्रमुख दत्तात्रय पटारे, अध्यक्ष रमेश केसरकर, लक्ष्मण पटारे, दिपक शेळके, अविनाश मते, निलेश मते आदिंसह मोठाजनसमुदाय सहभागी झाला होता.
तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांचे मार्गदर्शनाखालील पोलीस हवालदार राजू त्रिभुवन, पोलीस पाटील बाबासाहेब साळवे व सहकार्यांनी चोख बंदोबस्त ठेवला.
भोकर - येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे तिथीप्रमाणेच्या जयंती प्रसंगी सहभागी झालेले आण्णासाहेब काळे, प्रताप पटारे, सागर आहेर, राजेन्द्र चौधरी, गिरीश मते, ज्ञानेश्वर काळे, दिलीप पटारे, सुनील वाकडे, राहूल अभंग, दत्तात्रय पटारे, लक्ष्मण पटारे, दिपक शेळके, अविनाश मते, निलेश मते आदिंसह मान्यवर दिसत आहेत.
भोकर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे तिथीप्रमाणेच्या जयंती प्रसंगी सहभागी झालेले युवक उत्साहात या उत्सवात सहभागी झाल्याचे दिसत आहेत.
*पत्रकार चंद्रकांत झुरंगे -भोकर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111