shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

भूमी फाउंडेशन संस्थेची यशोगाथा खुपच प्रेरणादायी-डॉ.परवेज ग्रँड



पुणे प्रतिनिधी:
भूमी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य ही सामाजिक संस्था सुप्रसिद्ध मराठी सिने अभिनेत्री अलकाताई कुबल यांच्या शुभहस्ते व तरुण समाजसेवक प्रा. कैलास पवार यांच्या मुख्य संकल्पनेतून व सोबत असंख्य सेवाभावी प्रशासकीय,उद्योजक, वैद्यकीय, सेवानिवृत्त सैनिक लष्कर अधिकारी अशा विविध क्षेत्रातील लोकांना सोबत घेऊन २ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी लोकसहभागातून जन सर्वांगीण विकास हे ब्रीदवाक्य घेऊन स्थापित झाली आहे.संस्थेचे कार्य,उद्देश आणि ध्येय हे निश्चित खुपच प्रेरणादायी आहे. स्थापनेपासून संस्थेचा सामाजिक क्षेत्रातील आलेख हा उत्तरोत्तर वाढत आहे. आजच्या परिस्थितीनुसार सामाजिक क्षेत्रातील कार्य हे तारेवरची कसरत आहे.


भूमी फाउंडेशन संस्था प्रामाणिकपणे कार्य करत आहे.अशा संस्थेला विविध स्तरावरून सहकार्य होणे गरजेचे आहे.असे मत पुणे येथील नामांकित रुबी हॉल हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर परवेज ग्रँड यांनी म्हटले आहे.यावेळी भूमी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. कैलास पवार आणि इतर  पदाधिकारी यांनी डॉक्टर ग्रँड यांना भेटून संस्थेची यशोगाथा भेट दिली.याप्रसंगी संस्थेची संपूर्ण यशोगाथा पुस्तिका पाहता डॉ. ग्रँड यांनी समाधान व्यक्त केले. कैलास पवार यांनी कमी वयात सामाजिक कार्याचा घेतलेला ध्यास हा निश्चित भविष्यात मोठे शिखर गाठणारा असेल असेही डॉक्टर ग्रँड यांनी म्हटले.यावेळी व्हर्लपूल इंडिया कंपनीचे डायरेक्टर महेंद्र पाटील व फियाट इंडिया कंपनीचे विभागीय व्यवस्थापक प्रदीप पाटील आणी रुबी हॉल क्लिनिकचे डॉ.संदीप मुनोत,डॉ.वंदना सागवेकर, डॉ.अरविंद जैन तसेच सिम्बॉयसिसचे सी.पी.अशोक, डॉ.श्रावण काढवेकर व वारियर इंडस्ट्रियल सेफ्टी एंटरप्राईजेसचे डायरेक्टर नरेंद्र पाटील आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव
महाराष्ट्र प्रदेश प्रसिद्धी प्रमुख
 भूमि फाऊंडेशन,महाराष्ट्र राज्य 

*सहयोगी- स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close