shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

पडस्थळ येथे अखंड हरिनाम सप्ताह व तुकाराम गाथा पारायण सोहळा संपन्न

पडस्थळ येथे अखंड हरिनाम सप्ताह व तुकाराम गाथा पारायण सोहळा संपन्न
इंदापूर (पडस्थळ):- 
रविवार दि.७ एप्रिल २०२४ रोजी पडस्थळ( ता. इंदापूर) येथे छ.संभाजीनगरचे सनदी अधिकारी डॉ. विजयकुमार फड यांच्या काल्याच्या कीर्तनाने पंचदिवशीय अखंड हरिनाम यज्ञ व संत तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळ्याची सांगता करण्यात आली. 
दि. ३ एप्रिल  ते ७ एप्रिल या कालावधीत हा अखंड हरिनाम यज्ञ व गाथा पारायण सोहळा पार पडला. या सोहळ्याचे आयोजन  कल्याण पवार यांनी केले होते. यामध्ये पांडुरंग महाराज शेळके गारअकोले, हरिभाऊ महाराज शिंदे सोलापूरकर, दीपक महाराज बदाडे बीड, सोपान महाराज इंगळे(शास्री) बीड, व काल्याचे किर्तन डॉ.विजयकुमार फड, छ.संभाजीनगर यांनी कीर्तन सेवा सादर केली. व्यासपीठ चालक म्हणून मोहनराव वाघ,आढेगाव यांनी काम पाहिले. कीर्तनासाठी हार्मोनियमवर संभाजी बोंगाणे, शिवराम चोरमले, मृदंगाचार्य आकाश मुसळे, दादा आवटे, शुभम सुपेकर, चोपदार म्हणून सौदागर भांगे व गायनसाथ  हरिहर वारकरी शिक्षण संस्था ता.जि. अहिल्यानगर (अहमदनगर) यांनी बजावली. कीर्तनासाठी उपस्थित श्रोत्यांसाठी पाच दिवस भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. पहाटे काकडा, सकाळी तुकाराम गाथा पारायण, दुपारी गाथा भजन, सायंकाळी हरिपाठ, रात्री नऊ वाजता कीर्तन व तदनंतर हरीजागर असा दिनक्रम होता. या सोहळ्यासाठी पडस्थळ, चिंधादेवी, आजोती, पिंपरी, सुगाव, शिरसोडी, माळवाडी, कालठाण, नरुटवाडी, गलांडवाडी, कौठळी, बळपुडी, राजवडी, बिजवडी, तरंगवाडी, गोखळी, वडापुरी, सरडेवाडी, शहा, कांदलगाव इत्यादी पंचक्रोशीतून श्रोतेगण उपस्थित होते. पाणी वाटप व्यवस्था संत निरंकारी मंडळ पडस्थळ यांनी केली होती.
close