shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

गुढी पाडव्याचे मुहूर्तावर*भोकर येथे दिनांक ९ एप्रील रोजीपासून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व किर्तन सोहळ्याचा शुभारंभ


श्रीरामपूर प्रतिनिधी:
श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील श्रीक्षेत्र हनुमान मंदिर येथे गुढी पाडव्याचे मुहूर्तावर म्हणजेच मंगळवार दि.९ एप्रील पासून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व किर्तन महोत्सव या सोहळ्याचा शुभारंभ होत असून सांगता मंगळवार दि.१६ एप्रील रोजी वेदान्ताचार्य देवीदासजी महाराज म्हस्के यांचे काल्याचे किर्तनाने सांगता होत आहे.

गेल्या तीन वर्षापासून येथील भजनी मंडळ आयोजीत भोकर येथील श्रीक्षेत्र हनुमान मंदिर येथे श्रीक्षेत्र देवगडचे मठाधिपती गुरूवर्य भास्करगीरीजी महाराज, महंत स्वामी प्रकाशनंदगीरीजी महाराज, श्रीक्षेत्र सराला बेटाचे मठाधिपती महंत गुरूवर्य रामगीरीजी महाराज व येथील वैष्णव सेवाश्रमाचे मठाधिपती गुरूवर्य साहेबराव महाराज कांगुणे यांचे कृपाशिर्वादाने तसेच येथील सुदाम महाराज चौधरी, भागवताचार्य संतोष महाराज पटारे, राधेश्याम महाराज पाडांगळे, श्रीक्षेत्र अडबंगनाथ देवस्थानचे मठाधिपती जगद्गुरू स्वामी अरूणनाथगीरीजी महाराज, भागवताचार्य कु.आरतीताई शिंदे महाराज यांचे अधिपत्याखाली येथील ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व किर्तन महोत्स सोहळा संपन्न होत आहे.


या सोहळ्यात दररोज पहाटे ४ वा. काकडाआरती व भजन, सकाळी ७ वा. सामुदायीक ग्रंथराज ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पारायण, सायंकाळी ६ वा. हरीपाठ, रात्री ९ वा. जाहीर हरीकीर्तन तद्नंतर जागर या प्रमाणे दैनंदिन कार्यक्रम होत आहेत. व्यासपीठ चालक म्हणून येथील सुदाम महाराज चौधरी, निवृत्ती महाराज विधाटे व श्रीहरी महाराज चौधरी हे सेवा करत आहेत.

येथे मंगळवार दि. ९ एप्रील रोजी भोकर येथील भागवताचार्य संतोष महाराज पटारे, बुधवार दि.१० एप्रील रोजी आळंदी देवाची येथील योगेश्वरजी महाराज होन, गुरूवार दि.११ एप्रील रोजी ब्राम्हणी येथील माऊली महाराज मोरे, शुक्रवार दि.१२ एप्रील रोजी नेवासा येथील लक्ष्मण महाराज नागरे, शनीवार दि.१३ एप्रील रोजी मानोरी येथील भागवताचार्य किशोर महाराज जाधव, रवीवार दि.१४ एप्रील रोजी कोपरगाव येथील प्रभाकर महाराज बारगळ, सोमवार दि.१५ एप्रील रोजी सायंकाळी ४ वाजता ज्ञानेश्वरी ग्रंथाची मिरवणूक व दिंडी प्रदिक्षीणा होईल व रात्री ९ वा. घोडेगांव येथील महंत रामेश्वर महाराज राऊत शास्त्री याचे किर्तन होत आहे.

तर मंगळवार दि.१६ एप्रील रोजी सकाळी ९ वा. वेदांताचार्य देवीदासजी महाराज म्हस्के यांचे काल्याचे किर्तन होत आहे. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून या महाप्रसादाचे अन्नदान येथील सुनिल शिंदे, अतुल शिंदे, संतोष गायकवाड, सर्जेराव आहेर, गणेश झिने, बबन आहेर, रतन काळे व विठ्ठल चव्हाण हे करत आहेत.
या सोहळ्यास मोठ्या संख्येने सहभागी होवून भक्ती प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त ग्रामस्थ व भजनी मंडळ भोकर यांनी केले आहे.

*पत्रकार चंद्रकांत झुरंगे -भोकर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर -
*9561174111
close