श्रीरामपूर प्रतिनिधी:
श्रीरामपूर तालुका विधी सेवा समिती,वकील संघ,तहसील कार्यालय,पंचायत समिती, वनविभाग,व पोलीस उपविभाग श्रीरामपूर याच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दि. ९ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वा. तालुक्यातील शिरसगांव येथील विठ्ठल मंदिर ग्रामपंचायत समोर मानव- वन्यजीव संघर्ष जनजागृती शिबीर आयोजित करण्यात आले होते.त्यात प्रमुख अतिथी अध्यक्ष विधी सेवा समिती तथा जिल्हा न्यायाधीश एस.आर. यादव यांनी प्रतिपादन केले की, सध्या वन्य प्राण्यापासून संरक्षण कसे करावे व घ्यावयाची काळजी या महत्वाच्या विषयावर वाईल्ड लाईफ वार्डन डॉ. सुधाकर कुऱ्हाडे व प्रोजेक्ट व्यवस्थापक माणिकडोह बिबट निवारा केंद्र, जुन्नर आदींनी बिबट्यापासून संरक्षण कसे करावे व त्यासाठी घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर मार्गदर्शन व जनजागृती केली.
यामुळे परिसरातील नागरिक,शेतकरी सुरक्षित राहण्यास मदत होईल.या शिबिरात सूत्र संचालन विधिज्ञ सिनारे व विधिज्ञ मुकुंद गवारे यांनी केले.प्रास्तविक श्रीरामपूर बार असो.अध्यक्ष विधिज्ञ विष्णू ताके यांनी केले.कार्यक्रमात सहदिवाणी न्यायाधीश व्ही.बी. कांबळे,२ रे सह दिवाणी न्यायाधीश एन.के. खराडे,३ रे सह दिवाणी न्यायाधीश श्रीमती डी एस खोत,गट विकास अधिकारी प्रवीण सिनारे,एसीएफ गणेश मिसाळ,आयपीएस अधिकारी जीवन बेनिवाल, पोलीस निरीक्षक नितीन देशमुख आदी उपस्थित होते.यावेळी शिरसगांव, ब्राम्हणगाव,गोंधवणी, वडाळा महादेव,परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.
शिरसगांव ग्रामपंचायतीने उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष गणेशराव मुदगुले, सरपंच राणीताई वाघमारे,उपसरपंच संजय यादव,ग्रामविकास अधिकारी पी.डी.दर्शने आदींचे प्रमुख अतिथी यांनी कौतुक केले. शिबिराची सांगता वकील संघ सदस्य मनीषा उंडे यांनी आभार प्रदर्शनाने केली.
*ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरगांव
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन* समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर - *9561174111