रहमत,मगफिरत व बरकत चा महिना असलेल्या रमजान महिन्यात महत्वपूर्ण असणारी शबे कद्र आज (शनिवार) रात्री साजरी होत आहे.महिनाभर सर्व मशिदीतून तरावीहच्या नमाज मध्ये पठन झालेल्या कुरआन शरीफचे पठन आज पूर्ण होणार आहे.प्रेषित हजरत पैगंबरांनी कयामतची जी लक्षणे नमूद केली आहेत,त्यात एक असे ही म्हटले आहे कि दिवसांची बरकत निघून जाईल.साल महिन्यासमान,महिने आठवडयासमान, आठवडे दिवसासमान व दिवस तासासमान निघून जातील.त्याचा प्रत्यय आपण घेतच आहोत.सूर्य पूर्वेऐवजी पश्चिमेकडून उगवेल असं सुद्धा एक भाकीत करण्यात आलेलं आहे आणि २०३४ मध्ये हे घडणार आहे असे आत्ताच शास्त्रज्ञांनी जाहीर केले आहे.
इस्लामी शरियतनुसार शादी किंवा लग्न हा एक प्रकारचा करारनामा असून त्यात काजी, वकिल,दोन साक्षीदार या प्रक्रियेचे अंग आहे. लग्न जमविण्यापूर्वी मुलामुलीची पसंती हा लग्नाचा अविभाज्य भाग आहे.निकाह लावण्यापूर्वी वकिल जो मुलीकडून निवडला जातो तो दोन साक्षीदारा समक्ष मुलीची भेट घेतो व या लग्नाला तिची संमती (इजाजत) आहे किंवा नाही हे विचारतो. संमती नसल्यास निकाह होत नाही.
समाजात अनेक कारणांनी पती पत्नीचे घटस्फोट होत असतात. जेव्हा पती पत्नी म्हणून संसार करणे अशक्य होऊन जाते तेव्हा घटस्फोटाचा मार्ग स्विकारला जातो.पण त्यासाठीची प्रक्रिया क्लिष्ट स्वरुपाची आहे. न्यायालयात दिल्या जाणाऱ्या घटस्फोटात स्त्रीच्या अब्रूचे धिंडवडे काढले जातात. शिवायघटस्फोट झाला तरी स्त्रीला दुसरे लग्न करता येत नाही किंवा समाजात तिला अनेक समस्यांना तोंड दयावे लागते.अनेक गिधाडे वासनाधिन भावनेने अशा स्त्रीयांकडे पाहतात किंवा वागतात.पण इस्लामी शरियतनुसार अशा प्रथांना थारा नाही. ज्यावेळी विवाह संबंध टिकविणे किंवा निभाव करणे अशक्य होऊन जाते तेव्हाच तलाकचा मार्ग अनुसरण्याची अनुमती आहे.ज्या सहजतेने निकाह केला जातो त्याच सहजतेने दोन साक्षीदारांसमक्ष तलाक देऊन विवाह संबंध संपुष्टात येतात. त्यामुळे नवऱ्याविरुध्द खोटया केसेस किंवा ४९८ सारखे प्रकार न होता दोन्ही पक्ष स्वतंत्र घरोबा करण्यास पात्र ठरतात.ज्या स्त्रीचा तलाक झाला आहे तिला घरात बसून न ठेवता शक्य तितक्या लवकर तिचे दुसरे लग्न करुन देण्याची शिकवण शरियत मध्ये दिली आहे. म्हणजे तिच्या जीवनाची हेळसांड होणार नाही याची काळजी घेतली गेली आहे. इस्लामने स्त्री चा सर्वाधिक सन्मान केला आहे.स्त्री विधवा झाल्यास तिला सती जावे लागत नाही,पांढरे कपडे परिधान करावे लागत नाही,केशवपन केले जात नाही कुल्टा समजले जात नाही,ज्या स्त्रीचा घटस्फोट होतो किंवा वैधव्य प्राप्त होते, तिच्या व्यथा ही ती व तिच्या कुटुंबालाच माहिती असतात.या यातनातून तिची सुटका करण्याचा मार्ग इस्लामने दाखविला आहे, यासाठी तलाक व निकाह या मागील भूमिका समजून घेणे आवश्यक आहे. तलाक पिडीतांना सहानुभूती दाखविणे गैर नाही.पण अशी सहानुभूती दाखविणाऱ्या घटकांनी इतर समाजातील काही कोटींच्या संख्येत असलेल्या विधवा व घटस्फोटित भगिनींचाही विचार करणे आवश्यक आहे.शेवटी समाजात हा एक ज्वलंत प्रश्न आहे. विवाह किंवा घटस्फोट हा प्रत्येक समाजासाठी महत्वाचा प्रश्न आहे.(क्रमशः)
*सलीमखान पठाण (सर)
*श्रीरामपूर - 9226408082
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111