अजित पवार यांचा भाजप व शिवसेनेच्या सत्तेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय एकट्याचा नव्हता - आमदार यशवंत माने.
इंदापूर(लाखेवाडी):- अजित पवार यांनी जो निर्णय घेतला. भारतीय जनता पार्टी व शिवसेनेच्या सत्तेमध्ये सहभागी होण्याचा. तो अजित पवार यांचा एकट्याचा निर्णय नव्हता. तो निर्णय म्हणजे आम्ही ज्या ५० आमदारांनी त्यांना साथ दिलेली आहे. त्या सर्वांचा निर्णय आहे. अजित पवार यांना निर्णय घेण्यासाठी भाग पाडले आहे. वारंवार आम्ही अजित पवार यांना जाऊन म्हणालो दादा आमचा निधी येतो तो स्थगित केलेला आहे. दादा आमच्या भागामध्ये आम्हाला निधी मिळत नाही. अशा पद्धतीने २०२४ च्या निवडणुकीला सामोरे जायचे म्हटले तर आमची परिस्थिती सध्याची खराब आहे. तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल. वारंवार सर्व आमदारांनी जाऊन दादांना हॅमरिंग केलं. त्याच्यानंतर आम्ही दादांना विना शर्थ पाठिंबा दिला. दादा तुम्ही पाठिंबा देऊन टाका. तुम्ही एकटे जरी मंत्री मंडळात असला तर आम्ही सर्व मंत्री आहे असं वाटेल आणि आमच्या मतदार संघातील कामे मार्गे लागतील. अशा पद्धतीने मोहोळ चे आमदार यशवंत माने यांनी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भाजप व शिवसेना पक्ष बरोबर जाण्याच्या निर्णयासंदर्भातचा खुलासा लाखेवाडी येथे महायुतीच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुनेत्रा अजित पवार यांच्या निवडणूक गाव भेट दौऱ्या दरम्यान केला.
यावेळी महादेव घाडगे ,नवनाथ रुपनवर , संग्रामसिंह पाटील,शिवाजी तरंगे, अनिल काळे, संजय रुपनवर, नागेश गायकवाड , सुभाष तरंगे व लाखेवाडी गावच्या सरपंच चित्रलेखा ढोले, बाळासाहेब खुरंगे, शिवलालजी खराडे,लक्ष्मण नाईक, माऊली जामदार, बाळासाहेब खराडे ,राजेंद्र भोसले, किरण खुरंगे, संदीप साबळे, सखाराम थोरवे ,शिंगाडे ,अक्षय थोरवे, हनुमंत ढोले, बबन खाडे, पुनम ढोले व इतर अनेक मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी आमदार यशवंत माने बोलताना म्हणाले की, काल नरसिंहपूर येथे लक्ष्मी नृसिंह मंदिराच्या ठिकाणी श्रीफळ फोडून सुनेत्रा पवार यांच्या गावभेट दौऱ्याच्या प्रचाराचा शुभारंभ केला. महायुतीतील ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या पक्षाचा उमेदवार उभा असेल त्या ठिकाणी त्या त्या घटक पक्षातील सर्वांनी पूर्णपणे पाठिंबा देऊन सहकार्य करायचे आहे. जेवढे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मागासवर्गीय, अल्पसंख्यांक, आदिवासी यांनी अजित पवार यांचं नेतृत्व का स्वीकारलं ते अजित पवार यांच्याकडे का गेले .पाठीमागील २०१९ सालापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी किंवा आम्हाला आमच्या मतदार संघामध्ये आमची कॉलर ताट करण्यासाठी, सपोर्ट करण्यासाठी, ग्रामीण भागातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अजित पवार यांनी हजारो कोटी रुपयांचा निधी दिला .त्याच पद्धतीने आम्हाला सुद्धा २०२३ मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये दादांनी आमच्याकडे लक्ष दिलंच परंतु २ जुलै २०२३ ला ज्यावेळी ऐतिहासिक निर्णय घेतला गेला. राष्ट्रवादीत काँग्रेस पक्ष सत्तेमध्ये गेला त्यावेळेस आज जे ९ महिने पूर्ण होऊन ४ दिवस झाले. याच्यामध्ये प्रत्येक विधानसभा सदस्य विकासाच्या कामासाठी विकास निधी दिला. सर्व अल्पसंख्यांक, मागासवर्गीय मतदारांनी एका विचाराने दादांच्या पाठीमागे उभा राहायचे आहे. गेल्या वर्षी उन्हाळ्यामध्ये दोन आवर्तन सोडायचे होते तर दादा आणि मामा नसते तर दोन आवर्तने मिळाले असते का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
आमदार माने पुढे म्हणाले की,काल भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंदापूर मध्ये जाहीर मेळावा घेऊन हर्षवर्धन पाटील यांचं व त्यांच्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांचं बरोबर संवाद साधला. त्यांच्या काही अडीअडचणी असतील त्या समजून घेतल्या. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी एकच सांगितलं मोदी यांना तिसऱ्यांदा जर पंतप्रधान करायचा आहे .आपणाला ४८ च्या ४८ लोकसभा मतदार संघामध्ये एका विचाराने काम करावे लागेल आणि या ठिकाणी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उभा राहिले आहेत. त्यांना मनापासून साथ द्या. तुमच्या पालकत्वाची जबाबदारी माझी अशा पद्धतीने त्यांचे बोलणे झालेले आहे .त्यांनी त्यांना आश्वासित केलेले आहे. ते कालपासूनच आम्हाला खोरोची या ठिकाणी दुर्योधन पाटील भाजपचे आणि साखरे म्हणून शिवसेनेचे या दोघांनी भाषण करून पूर्णपणे मनापासून पाठिंबा दिला आहे .त्यामुळे कालच्या कालच आपणाला रिझल्ट मिळालेला आहे.
तसेच आमदार माने यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना उद्देशून म्हटले की, लग्न आपल्या घरच आहे. दोन पावलं पाठीमागे सरा भाजपच्या कार्यकर्त्यांबरोबर जुळवून घेऊन एका विचाराने काम तुम्ही करा. कारण मतदानाची टक्केवारी वाढवायचे आहे .आपल्याला उमेदवार कोणाचा नसून महायुतीचा उमेदवार आहे असं समजा. राष्ट्रवादी तोपर्यंत लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत बाजूला ठेवा. महायुतीचा उमेदवार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना येणाऱ्या ७ मे रोजी घड्याळात समोरील बटन दाबून एकतर्फे मतदान आपल्याला लाखेवाडी गावामध्ये द्यायचे आहे. असा सल्ला यावेळी दिला.
लाखेवाडी गावच्या सरपंच चित्रलेखा ढोले यांच्या बद्दल बोलताना माने म्हणाले की,ढोले सर मॅडमचा प्रस्तावना ऐकल्यानंतर आम्हाला वाटलं काही अडचण नाही आता पुरुषांच्या ऐवजी महिला जरी पडली भविष्यामध्ये आपणास कुणाला अडचणी येणार नाही. त्यामुळे आमची ही अडचण दुसरी सुटलेली आहे. अशा शब्दात पुढील राजकीय सुतवाच चित्रलेखा ढोले त्यांचा त्यांनी यावेळी दिला.
आमदार यशवंत माने यांनी शेवटी आपले मत व्यक्त करताना म्हटले की,येणाऱ्या ७ तारखेला सुनेत्रा पवार यांच्या नावासमोरील घड्याळाच्या चिन्ह समोरील बटन दाबून एकतर्फी मतदान करावा आणि त्यांना चांगल्या मतदानाने आपण निवडून द्यावे एवढीच मी नम्र विनंती करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आदेशाने येऊन या ठिकाणी आपणास संवाद साधत आहे. अशा पद्धतीने त्यांनी आपले मत व्यक्त केले.
तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे म्हणाले की,बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकडे अख्या देशाचे लक्ष लागलेले आहे. सुनेत्रा पवार दोन ते अडीच लाख मताधिक्याने निवडून येणार आहेत. हर्षवर्धन पाटील व प्रवीण माने उद्यापासून प्रचाराला सुरुवात करतील.
कुठे नुसत्या सेल्फी घेऊन निवडणूक लढवायची नसते. पंधरा वर्षे हाताच्या फोडाप्रमाणे या तालुक्याने आपल्याला संभाळलेले होते. तुम्ही या तालुक्याची आणि बारामती लोकसभा मतदारसंघाची निराशा केलेली आहे .त्यामुळे इथून पुढे सुनेत्रा वहिनी निवडून येऊन त्या इंदापूर तालुक्याचं ७० ते ८० हजाराचे लीड घेऊन त्यांना दिल्लीला पाठवायचा आहे. सुनेत्रा पवार यांच्या मुळे तालुक्यात विकास होणार आहे. त्यामुळे त्यांना घड्याळ्याच्या चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड मताने निवडून द्या .
यावेळी माजी सभापती प्रशांत पाटील, जि .प .सदस्य श्रीमंत ढोले, कार्याध्यक्ष अतुल झगडे, बापूराव शेंडे यांनी मनोगत व्यक्त केले व लाखेवाडी च्या सरपंच चित्रलेखा ढोले यांनी प्रास्ताविक केले.