shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

शिवजयंतीनिमित्त रंगले कविसंमेलन


पुणे प्रतिनिधी:
साहित्यसम्राट पुणे ही संस्था मराठी भाषा संवर्धनासाठी विविध उपक्रमांद्वारे अनेक ठिकाणी  कवी संमेलनाचे आयोजन करत असते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विनोद अष्टुळ यांनी १८२ वे कवी संमेलन निळकंठेश्वर शिव मंदिर हडपसर येथे शिवजयंती निमित्त आयोजित केले होते.



 यावेळी कविसंमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी मेघराज पाटील होते.  यावेळी श्री.पाटील म्हणाले की मी अहिराणी पण साहित्य सम्राट संस्थेने मला अनेक वर्षापासून हे हक्काचे विचारपीठ दिले आहे.  या संस्थेत हिंदी, मराठी, उर्दू ख्रिस्ती साहित्यिकांसोबत कोकणी, वैदर्भी, अहिराणी आणि इतर भाषांचेही मोठ्या आनंदानें स्वागत होत असते.
 श्री निळकंठेश्वर मंदिराच्या प्रांगणात अनेक वेगवेगळ्या विषयांच्या बहारदार रचना सादर झाल्या. यामध्ये मेघराज पाटील, विनोद अष्टुळ, सौ.चंदा वाडकर, राहूल भोसले, जयश्री भोसले, नानाभाऊ माळी, सुभाष बडधे महाराज, गौरव नेवसे, बबन धूमाळ, ॲड.उमाकांत अदमाने, विठ्ठल कुलकर्णी, सूर्यकांत नामुगडे, किशोर टिळेकर, रामदास शेळके आणि इतर कवी कवयित्री यांनी मंदिरातील शिवभक्त आणि काव्यरसिक यांची मने जिंकली. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनोद अष्टुळ, उत्कृष्ट सूत्रसंचालन  आदमाने आणि कार्यक्रमाचे आभार नानाभाऊ माळी यांनी अहिराणी भाषेत व्यक्त केले.


*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close