------------------------------------
*रमजानुल मुबारक - २०२४*
रमजान रोजा नं.२६ वा ,
शनिवार दि.०६ एप्रिल २०२४
लेखन:- डॉ सलीम सिकंदर शेख ,
बैतुशशिफा हॉस्पिटल, मिल्लतनगर श्रीरामपूर - मोबा: ९२७१६४००१४ .
----------------------------------------
*इस्लाम समजून घेताना"*
दिव्य कुरआन मधे
,(१) " आम्ही (अल - कुरआन ) ला कद्र च्या रात्रीत अवतरीत केले आहे
(२), आणि तुम्हाला काय माहीत की ?? " कद्र " ची रात्र काय आहे ?? ,
(३ ), कद्र ची रात्र हजार महीण्यांपेक्षा ही अधिक उत्तम आहे ;
(४ ) , दुत ( ईशदुत) आणि रुह (जिब्राईल अलै.) त्यात आपल्या पालनकर्यांच्या आज्ञेने प्रत्येक आदेश घेऊन उतरतात ;
( ५ ) ,लैलतुल कद्र ची रात्र पुर्णतः " शांती "आहे.. उषःकाला पर्यंत. (दिव्य कुरआन पारा ३० सुरह नं.९७ आ.नं.१ ते ५).
हजरत ईब्नै अब्बास रजि. हे प्रेषितांंचे मित्र म्हणतात , प्रेषित मुहम्मद स्व. सल्लमांनी सांगितले , " लैलातुल कद्र ची रात्र रमजान महीन्याच्या अंतिम चरणात येते , अंतिम दहापैकी विषम संख्येने येणाऱ्या २१ वी , २३ वी, २५ वी , २७ वी , २९ वी या पाच रात्री येतात " .(सहीह बुखारी २०२२).
हजरत आयेशा रजि. प्रेषित मुहम्मद स्व.सल्लमांची पत्नी , सांगतात की," रमजानच्या जेव्हा अंतिम दहा रात्री येत असत ; त्यावेळेस , प्रेषित स्व. स्वतः स्वच्छ ड्रेस परिधान करून ; त्यांच्या बरोबर घरातील मंडळींना तीलावत - प्रार्थना करण्यासाठी संपूर्ण रात्रभर जागवीत असत." ( सहीह बुखारी २०२४).,
या प्रत्येक लैलतुल -कद्र च्या रात्रीं रोजच्या दैनंदिन रात्रीं पेक्षा ही ( १०००) एक हजार महीण्यांपेक्षा ही अधिक महिन्यांच्या रात्रीपेक्षा जास्त सबाब -पुण्यवान असतात.
दिव्य कुरआन म्हणते की, " आम्ही या रात्र मध्ये दिव्य कुर'आन पृथ्वीवर तुमच्या मार्गदर्शनासाठी अवतरीत केला आहे ," आणि तुम्हाला काय माहीत की ही रात्र काय असते ; तुम्हाला कधी या रात्रीचे महत्त्व जाणाले. तर , तुम्ही स्तब्द व्हाल ,व तुम्हाला भान राहणार नाही ," (सुरह नं.९७ आ.नं.१-ते - ५).
यांमध्ये कोणती खास एकच रात्र महत्त्वाची आहे , हे तज्ञांमध्ये मतमतांतरे आहेत . त्यावर अल्लाह (ईश्वरा)ने लैलतुल -कद्र च्या रात्रींचं गुपित स्वतः कडे ठेवलं आहे.
दिव्य कुरआन म्हणते की ," जे समोर आहे आणि जे काही गुपित आहे या सर्वांचे ज्ञान फक्त अल्लाहा ( ईश्वरा) कडेच आहेत ; व आपल्या ज्ञानाच्या मर्यादा या जो पर्यंत मर्यादित आहे , फक्त जेवढेच अल्लाहा(ईश्वर) ने माणसाला प्रदान केलेले आहेत , या रात्रीचे ज्ञान फक्त आल्लाहा (ईश्वर)ने स्वतः जवळच ठेवले आहेत.
तज्ञांच्यां संशोधनाच्यां कुवतीनुसार :- जर लैलतुल-कद्र च्या फक्त एका रात्रीचं एक शब्दही ही नमन - चिंतन - क्षमा - माफी (असतगफीरुल्लाह ) मगफिरत मागितली व अल्लाहच्या सांगितलेल्या सरळ मार्ग च्या बाजूने चालले,( तर गणिती भाषेत एक रात्र लैलतुल कद्र ची किंवा एक हजार (१०००) महीन्यांच्या दिवसानुसार फक्त एका रात्रीत किती -सेकंद, ,#किती - मिनिटे, # किती -तास , किती -दिवस, किती- वर्षांची ईबादत ,बंदगी,होते त्यांची गोळा बेरीज केली .एक १ सेकंद = २३ तास ईबादत , १ एक मिनिट = ५८ दिवसांची ईबादत , एक तास = ९ -८ वर्षे ईबादत , शेवटी एक रात्र = ८३ वर्षे (त्रेयांशी) वर्षे (इयर्स )ईबादत ,बंदगी ( पुजा ) होते .सबाब फक्त एकट्या एका रात्रीचं महत्व.
अगर एवढे सारं काही एका रात्रीत भेटत असेल तर; एक एक सेकंद- मिनिटे का ? वाया घालवायचं.
प्रेषित मुहम्मद स्व. सांगितले की, '' लैलतुल-कद्र 'च्या रात्री आल्लाह शेवटच्या सातव्या आकाशावर येऊन पृथ्वीतलावरील प्राणीमात्रांना व माणसांना आव्हान करतात की ,
" (१) कोण आहे जे माझ्याकडे दयेची याचना करतोय की मी त्याला दया देईल - दाखवील ; " (२) कोण आहे , जो करूणेची भिख मागेल ,मी त्याला करूणेची भिक देईल ,"
(३)" कोण आहे ,जो आपल्या केलेल्या लहान-मोठ्या पापांची क्षमा याचना मागतोय , की मी त्याला क्षमा देईल .
" (४) " कोण आहे ,जो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्या म्हणून माझ्याकडे मागणं मागतो मी , त्या सर्व मनोकामना पूर्ण करील ". " सर्वांना मनोभावे माफी देईल.",
" पुन्हा प्रेषित मुहम्मद स्व म्हणतात की," या लैलतुल-कद्र च्या रात्री आल्लाहा दोन्ही हात मोकळे करून मानव जातीस अव्हान करतात की ;" कोण आहेत जो एक आशा आल्लाहाला कर्ज दिईल की ; जो दरिद्री नाही व अत्याचारी तर नाहींच , नाही ".
अल्लाह ( ईश्वरा) हे सकाळी भोर पहाटेपर्यंत आव्हान करून त्यांचे -क्षमा- दया - करुणा - बक्षिसे, देण्याचे काम चालूच असते, परंतु , माणवजातीला आव्हानांची फिकीर -कदर नसते ; लोकं सुस्तावलेले असतात , येवढ्या विचार करण्याची मानसिकताच नसते .
अल्लाहला काय ?? गरज कर्जांची .
जशी आपली आई जेव्हा स्वतः च्या मुलां कडून काही छोटीशी अपेक्षा करते की मला काहीतरी दे अगदी त्याचप्रमाणे अल्लाह ही आपल्याला आपल्या आईप्रमाणे जाणून-बुजून आपल्याला कर्ज मागतात . कशासाठी ..? कशासाठी ?? -गरीब - अनाथ - पीडित - लाचार - विधवा हे शहरां, खेड्यांत उपाशीपोटी -भुकेले पोटी पुष्कळ प्रमाणात बघायला मिळते.. म्हणून या चराचर जीव जंतुंची काळजी अल्लाहला कायमच राहते यासाठी "
संपूर्ण मानवजात - प्राणिमात्र - जीवजंतू हे अल्लाहनेच निर्माण केलेले . सर्व जगात जगाने कितीही मागितले. ; तरी ; त्यांच्या अथांग महासागरात समजा ऐक सुईच्या टोकाला जेवढे थैंब येतील तेवढे कणभरही कमी होणारं नाहीत.
म्हणूनच आजच्या लैलतुल कद्र च्या एक -एका-लम्हा- लम्हां - सेकंद- सेकंदांच्या सबाब पदरात पाडून घ्या...
*लेखक - डॉ. सलीम सिकंदर शेख*
बैतुशशिफा हॉस्पिटल, श्रीरामपूर
9271640014
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*