shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

पिठेवाडीच्या सौ. राजश्री दादासाहेब कोळी यांनाराज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्काराने सन्मानीत .

 पिठेवाडीच्या सौ. राजश्री दादासाहेब कोळी यांना
राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्काराने  सन्मानीत .
इंदापूर: पिठेवाडी(ता. इंदापूर) येथील सौ. राजश्री दादासाहेब कोळी यांना अविष्कार फाउंडेशन च्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने राज्यातील विविध क्षेत्रात  कार्यरत सक्षम महिलांना अविष्कार सामाजिक आणि एज्युकेशनल फाउंडेशन इंडिया शाखा सोलापूर जिल्ह्याच्या वतीने २९ मार्च २०२४ रोजी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री. दिपक आर्वे , सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त, सोलापूर जिल्हा   , कार्यक्रमाचे अध्यक्ष सचिन वायकुळे, संचालक, स्मार्ट भाषण कला अकॅडमी, बार्शी या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक  संजय पवार,संस्थापक /अध्यक्ष, आविष्कार सामाजिक व एज्युकेशनल फौंडेशन, इंडिया, प्रमोद आवताडे , अध्यक्ष,श्रीकृष्ण गुरूकूल शिक्षण संस्था वाघोली-मोहोळ , इसाक पटेल, धाराशीव जिल्हा अध्यक्ष, रंगराव सुर्यवंशी उर्फ हरीओम, अॅड. शांताराम पाटील, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ. संतोष भोसले, डॉ. दादासाहेब कोळी व इतर मान्यवर उपस्थित होते.
 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक  जब्बार शिकलगार, या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन - संजय घोडके आणि सौ. स्नेहल खंकाळ, यांनी केले.
तर कार्यक्रमाचे आभार  ए. बी. शेख, सोलापूर जिल्हा सेक्रेटरी, आविष्कार फौंडेशन, इंडिया (सोलापूर)यांनी केले.
 
सौ राजश्री दादासाहेब कोळी, सहाय्यक शिक्षिका सदाशिवराव माने विद्यालय अकलूज तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथे कार्यरत असून त्यांनी सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या आणि करीत असलेल्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सौ राजश्री कोळी यांनी माहिती तंत्रज्ञान, संगणक, डिजिटल कॅमेरा, मोबाईल, इंटरनेट इत्यादी मायावी माध्यमांच्या पसाऱ्यात मर्यादशील होऊन, काळाबरोबर व्रतस्थपणे झोकून देऊन त्या काम करीत असून समाजाप्रती असलेली तळमळ, सामाजिक निष्ठा आणि प्रेम यामुळेच त्यांनी समाजाच्या विविध क्षेत्रात वैविध्यपूर्ण काम केले आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून जागतिक महिला दिन २०२४ च्या निमित्ताने त्यांना सोलापूर जिल्हा शाखेचा राज्य पातळीवरील " राजमाता जिजाऊ पुरस्कार-2024" देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.

त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात काम करीत असताना वेगवेगळ्या समाजातील गरजवंत मुलामुलींना शिक्षण घेत असताना शिक्षणात येणाऱ्या अडचणी प्रती शैक्षणिक व आर्थिक मदत सामाजिक भावनेने करुन दिलासा आणि आत्मविश्वास मिळेल अशाच प्रकारचे कार्य केले आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत असताना विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून  कार्यरत राहील्या. या प्रयत्नांमुळे अनेकांना नवसंजीवनी मिळाली असून हा गौरव म्हणजे  कृतज्ञता होय. शैक्षणिक क्षेत्रात  समाज उन्नतीसाठी प्रयोगशील असे काम केले आहे . समोर आलेल्या संकटांना कधी न घाबरता. संकटांना आव्हान म्हणून घेतले आणि पार करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली. यश मिळवणे हेच  डोक्यात ठेवले त्यामुळे या क्षेत्रात  उत्तुंग असे कार्य केले.

close