श्रीरामपूर प्रतिनिधी:
तालुक्यातील वडाळा महादेव येथील आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार यांच्या वतीने आनंद अनुभूती शिबिर तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
सदरील शिबिरामध्ये सुदर्शन क्रिया योग आणि ध्यान परस्परसंवादी प्रक्रिया व्यावहारिक शहाणपण तसेच अनुभूती तणावमुक्त शांत आणि प्रसन्न मन शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्साह आणि सकारात्मकताएकाग्रता आणि संवाद कौशल्य भावनिक स्थैर्य आणि सजगता शिबिराचा कालावधी दि. २ एप्रिल ते ७ एप्रिल २०२४ पर्यंत असणार आहे.
शिबीराची वेळ- सकाळी ६ ते ९ , शिबीराचे ठिकाण श्री. सुरेश बाठीया कार्यालय कृष्णा कलेक्शन जवळ के.व्ही.रोड श्रीरामपूर याठिकाणी शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे.
शिबीराचे प्रशिक्षक श्री.सतीश आहेर असुन ज्यांनी आपल्या वयाची १८ वर्षे पूर्ण केलेली आहेत अशा सर्व व्यक्ती या शिबिरात सहभागी होऊ शकतात असेही प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
*पत्रकार राजेंद्र देसाई - वडाळा महादेव*
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*