श्रीरामपूर प्रतिनिधी:
श्रीरामपूर येथील ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. दादासाहेब निघुट यांचे चिरंजीव डॉ. शुभम निघुट यांनी तैरणा मेडिकल कॉलेज नवी मुंबई या ठिकाणी एम बी बी एस परीक्षेमध्ये प्राविण्य मिळवून यश संपादन केले आहे,याबद्दल डॉ. शुभम निघुट यांचे मानवता जीवन कल्याण सेवाभावी संस्था तसेच श्रीरामपूर वकील संघ यांच्याकडून सन्मान करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अनिल साळवे, ॲड. दादासाहेब निघुट, ॲड. प्रमोद सगळगिळे,ॲड. विनोद तोरणे मा.पोलिस निरीक्षक गोरक्षनाथ बनकर यांनी संस्थेच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन डॉ. शुभम यांना शुभेच्छा व्यक्त केल्या.
प्रसंगी ॲड. सगळगिळे,प्रा. नानासाहेब गांगड, प्रा. दादासाहेब कर्णे, प्रा. जगदिश बनसोडे, प्रा. राजेन्द्र हिवाळे, प्रा. भिसे यांनी मनोगत व्यक्त करत निघुट परिवाराने कठीण प्रसंग अनुभवत जिद्द चिकाटी ठेवत मुलांचे स्वप्न साकार केले आहे, भविष्यात डॉ. शुभम यांचे कडून देशसेवा, गोसेवा आईवडीलांची सेवा घडो असे प्रतिपादन अध्यक्ष अनिल साळवे सर यांनी केले.
यावेळी उदयोजक किसनशेठ आहुजा, इंजि. अविनाश काळे, हवालदार नितीन भालेराव, बाळासाहेब भोसले, जितेन्द्र पाटील, विनोदशेठ चोरडीया, बाळकृष्ण कांबळे सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब जपे, पत्रकार राजेन्द्र देसाई आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमांचे सुत्रसंचालन अनिल साळवे सर यांनी केले तर ॲड. दादासाहेब निघुट यांनी आभार मानले.
*पत्रकार राजेंद्र देसाई - वडाळा महादेव
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111