श्रीरामपूर प्रतिनिधी:
मी श्रीरामपूरच्या एम.आय.डी. सी. ला विरोध केला हा अपप्रचार आहे. आपला विरोध एम.आय. डी.सी. ला नव्हता, तर मी आमदार असून माझे नाव निमंञण पञिकेत डावलून शिष्टाचार पाळला नाही यांस होता. हि वस्तुस्थिती जाणून घ्यावी, असे प्रतिपादन माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी केले आहे.
राधाकृष्ण विखे यांनी मी एम.आय.डी.सी. ला विरोध केल्याचा आरोप केला. हा आरोप बिनबुडाचा व निराधार आहे. मी श्रीरामपूरचा इंदिरा काँग्रेसचा आमदार असताना सन १९८३ मध्ये इंदिरा काँग्रेसचे स्व.रामराव आदिक हे तत्कालीन उपमुख्यमंञी तथा उद्योगमंञी होते. तर मी श्रीरामपूर मतदार संघाचा इंदिरा काँग्रेसचाच आमदार होतो. एम.आय.डी.सी. च्या शुभारंभाच्या पञिकेत स्व.रामराव आदिक व मी असे दोघेही इंदिरा काँग्रेसचे असतानाही माझे नाव डावलून आपले बंधू वैजापूरचे तत्कालीन आमदार स्व.गोविंदराव आदिकांचे नाव टाकण्यात आले. हा शासकीय शिष्टाचाराचा भंग तसेच श्रीरामपूरच्या जनतेचा अवमान होता. यामुळे या प्रकारास आपण विरोध केला होता. नविन पिढिला हा खरा इतिहास माहित व्हावा व दिशाभूल होवू नये, यासाठी आपण हा खुलासा करीत आहोत.
जे माझ्यावर आरोप करतात त्या राधाकृष्ण विखे यांचे वडील चाळीस वर्षे खासदार होते. त्यांचे दिवटे चिरंजीव राधाकृष्ण विखे हे सन १९९६ पासून आजवर विविध मंञीपदे, जिल्ह्याचे पालकमंञी पदे उपभोगित आहेत. श्रीरामपूरच्या जनतेने त्यांना मते दिलेली आहेत. असे असताना विखे यांनी श्रीरामपूरच्या एम.आय.डी.सी. त उद्योगधंदे कां आणले नाहित. तसेच आपल्या शिक्षण संस्थेमार्फत एखादे महाविद्यालय श्रीरामपूर येथे कां सुरु केले नाही, असा सवाल श्री.मुरकुटे यांनी उपस्थित केला.
श्रीरामपूर तालुक्याचे पाटपाणी पळवून श्रीरामपूर तालुक्याचे वाटोळे करणाऱ्या विखेंनी श्रीरामपूरबद्दल खोटा कळवळा दाखवून आपले पापावर पांघरुन घालण्याचे उद्योग करु नयेत. विखे यांचे श्रीरामपूरबद्दलचे पुतना मावशीचे प्रेम श्रीरामपूर तालुका चांगले ओळखून असल्याने विखेंच्या दिशाभुलीला श्रीरामपूरची जनता भुलणार नाही, असे श्री.मुरकुटे म्हणाले.
*पत्रकार अफजल मेमन - श्रीरामपूर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111