shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला माणुसकीची शिकवण दिली - ससाणे


 श्रीरामपूर प्रतिनिधी:
 वंचितांच्या कल्याणासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला माणुसकीची शिकवण दिल्याचे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक, माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी केले. श्रीरामपूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित भारतरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती कार्यक्रम प्रसंगी ससाणे बोलत होते. 

ससाणे पुढे म्हणाले की, प्रचंड बुद्धिमत्ता लाभलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा गुरु मंत्र दिला.आदर्श भारतीय संविधानाची निर्मिती करून सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला व दलित समाजाला त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्याचे महान कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवन प्रवास त्यांच्या अभ्यासू आणि कृतिशील व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडवतो. यावेळी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष संजय फंड, काँग्रेसचे शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस हेमंत ओगले, माजी नगरसेवक  दत्तात्रय सानप, आशिष धनवटे, अरुण मंडलिक, रितेश रोटे, मर्चंटचे अध्यक्ष मुन्ना झंवर, गौतम उपाध्ये, प्रवीण गुलाटी, राहुल कोठारी, बाळासाहेब खाबिया, प्रवीण नवले, विलास काका लबडे, कॉंग्रेस सेवा दल चे अहमदनगर जिल्हा मुख्य समन्वयक मास्टर सरवरअली सय्यद, रावसाहेब आल्हाट, अशोक जगधने, डॉ. राजेंद्र लोंढे, सुरेश ठुबे, रितेश एडके, अशोक बागुल, नवाजभाई जहागीरदार, सुनील साबळे, निलेश भालेराव, रितेश चव्हाणके, भैयाभाई अत्तार, युनुस पटेल, बाबा वायदंडे, वैभव पंडित, संजय गोसावी, जाफर शहा, विशाल साळवे,गणेश काते, वैभव कुऱ्हे, तीर्थराज नवले, राजेश जोंधळे, आकाश जावळे, कल्पेश पाटणी, सागर दुपाटी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


*पत्रकार राजू मिर्जा
ब्यूरो चिफ: नाशिक विभाग 
स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close