पैठण प्रतिनिधी:
प्रसिध्द साहित्यिक अय्युब पठाण लोहगांवकर यांचा शाळेतील मुला-मुलींना वाचनीय असलेला व बालमनावर सुसंस्कार करणारा अतिशय दर्जेदार बाल कथासंग्रह "कष्टाच्या वाटा" हे पुस्तक गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर साजापूर ता.जि.छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद ) जि. प. उच्च प्राथमिक शाळा आणि वडगांव कोल्हाटी येथील जि. प. शाळा, या शाळेला लेखक अय्युब पठाण यांनी कथासंग्रह भेट म्हणून दिले. या प्रसंगी वडगांव कोल्हाटी शाळेचे मुख्याध्यापक श्री. सुनील चिपाटे, तसेच साजापूर जि. प. शाळेचे मुख्याध्यापक श्री. धनंजय नागमवार यांनी " कष्टाच्या वाटा " या बाल कथासंग्रहाची प्रती भेट स्विकारून लेखक आणि पुस्तकाचे स्वागत केले. याप्रसंगी शिक्षक- सचिन वाघ, (तालुका शिक्षक सेनेचे अध्यक्ष) भास्कर गोपाळ, तसेच बिडकीन येथील शिक्षक अनिल जाधव, देविदास काळे, आणि प्रख्यात साहित्यिका तथा उपक्रमशील शिक्षिका श्रीमती अलकनंदा घुगे- आंधळे, मनिषा ढवळे, अश्विनी मोरे, रेणूका शिंदे आणि शाळेतील विद्यार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
*"कष्टाच्या वाटा" कथासंग्रहाचे स्वागत करतांना मुख्याध्यापक सुनिल चिपाटे,मुख्याध्यापक धनंजय नागमवार, शिक्षक- सचिन वाघ, अनिल जाधव, भास्कर गोपाळ दिसत आहे.*
-------------------------------------------------------
*पत्रकार हारुन के.शेख - पैठण
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111