श्रीरामपुर प्रतिनिधी:
एस.के.सोमय्या प्राथमिक विद्या मंदिर शाळेत ईयत्ता दुसरीच्या वर्गात शिकणारा चि. साईश रामेश्वर ढोकणे याने ध्येय प्रकाशन संचलित आय एम विनर या परीक्षेत २०० पैकी १९८ गुण मिळवुन राज्यात दुसरा क्रमांक मिळवीला, या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. तसेच मंथन स्पर्धा परीक्षेत १५० पैकी १३६ गुण मिळवुन राज्यात आठवा तर जिल्ह्यात तिसरा क्रमांक मिळविला, महात्मा फुले प्रज्ञा शोध जिल्हा स्तरीय स्पर्धेत १५० पैकी १३० गुण मिळवुन द्वितीय क्रमांक मिळविला.तर कँमेरेज हाय इंटरनँशनल स्कूल अँण्ड ज्युनिअर काँलेज संचलित कौन बनेगा लिटल इन्स्टेंन या तालुका स्तरीय स्पर्धेत १०० पैकी १०० गुण मिळवुन तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला.
साईश ढोकणे हा श्रीरामपुर तालुका पोलीस स्टेशनला कार्यरत असणारे पोलिस हवालदार रामेश्वर ढोकणे यांचे चिरंजीव आहेत. त्यास एस.के. सोमय्या प्राथमिक विद्यामंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका पैठणी मँडम तसेच वर्गशिक्षिका श्रीमती मेघा पवार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यावेळी आपले आयडाँल विश्वासराव नांगरे पाटील असल्याचे चि. साईश याने बोलुन दाखविले. चि.साईश च्या या दैदिप्यमान यशाबद्दल सर्वत्र त्याचे कौतुक करुन अभिनंदन केले जात आहे.
*पत्रकार देवीदास देसाई - बेलापूर*
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111