चेतना कॉलेज ऑफ फार्मसी च्या विद्यार्थ्यामार्फत कांदलगाव येथे "श्रमदान" व "वृक्षारोपण".
कांदलगाव:सरडेवाडी येथील चेतना कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (एन एस एस) विभागाच्या विद्यार्थ्या मार्फत "श्रमदान" अभियाना अंतर्गत "सक्षम युवा समर्थ भारत"हा कार्यक्रम इंदापूर तालुक्यातील कांदलगाव या ठिकाणी घेण्यात आला. या कार्यक्रमा वेळी सर्व विभागाच्या विद्यार्थ्यांचे पालक व परिसरातील लोक उपस्थित होते. या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी गावातील ग्रामपंचायत कार्यालय परिसर, गावातील रस्ते, अंगणवाडी परिसर, जिल्हा परिषद शाळा परिसर, गावातील विद्यालयाचा परिसर श्रमदाना मार्फत स्वच्छ केला आणि गोळा केलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावली. त्यानंतर जिल्हा परिषद शाळा परिसर, अंगणवाडी परिसर व विद्यालय परिसरामध्ये गुलमोहर, आपटा, फाइकस, बकुळ, रेन ट्री इत्यादी वेगवेगळ्या प्रकारच्या वृक्षाचे "वृक्षारोपण" करण्यात आले. अभियानासाठी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातील सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा. भैरव व्यवहारे, विद्यार्थी प्रतिनिधी शुभम साठे आणि विद्यार्थिनी प्रतिनिधी सानिका गायकवाड यांनी श्रमदानाचे शिस्तबद्ध नियोजन केले. कार्यक्रमासाठी गावातील पोलीस पाटील श्रीमती शैलजा पाटील, श्री. रणजीत बाबर, ग्रामपंचायत कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे शिक्षक अमोल भुजबळ, सुप्रिया पांढरे, कैलास खबाले, पूजा बनसोडे यांनी सहाय्य केले. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रियंका पारेकर यांच्यासह संस्थेचे अध्यक्ष उदय देशपांडे , सचिव विलास भोसले आणि खजिनदार सोमनाथ माने यांचे मोलाचे सहकार्य लाभले.