shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

पर्यावरण संरक्षण व संवर्धन ही लोकचळवळ व्हावी - प्रमोद मोरे


लोहगाव प्रतिनिधी:
पर्यावरण संरक्षण व संवर्धन ही लोकचळवळ व्हावी असे प्रतिपादन प्रमोद मोरे यांनी केले. राळेगणसिद्धी येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित पर्यावरण मेळाव्यात निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे राज्य अध्यक्ष प्रमोद मोरे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी वनाधिकारी श्री प्रभाकर म्हस्के होते.


यावेळी बोलताना प्रमोद मोरे म्हणाले की स्वर्गीय आबासाहेब मोरे व ज्येष्ठ समाजसेवक डॉ.अण्णासाहेब हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था कार्यरत असून आज राज्यभर या संस्थेचे भरीव काम सुरू आहे.वृक्षारोपण व त्याचे संगोपन व पर्यावरण पूरक उपक्रम राबवत ही संस्था राबवत असते.विशेष म्हणजे या संस्थेमध्ये शिक्षकांची संख्या जास्त असल्याने ही संस्था विद्यार्थी शिक्षक हा केंद्रबिंदू मानून त्यांच्या माध्यमातून काम करत आहे.ही संस्था नेहमीच पर्यावरण संमेलने आयोजित करत असते.सध्याचे वाढते तापमान,कमी झालेले आयुर्मान व पर्यावरणाच्या समस्या  भेडसावताना दिसत आहे. प्रत्येकानेच आपले आद्य कर्तव्य म्हणून पर्यावरण पूरक उपक्रम राबवले पाहिजे.यावेळी श्री चंद्रकांत शिंदे,श्री विलास महाडिक,श्री मोहन क्षिरसागर, वनश्रीताई मोरे,छायाताई राजपूत,संतोष परदेशी,सुभाष वाखारे,मारूती कदम,तुकाराम अडसूळ,लतिका पवार,अनिल लोखंडे,रविंद्र पवार,उत्तम पवार, अण्णासाहेब साबळे चंद्रकांत भोजने,सुहास गावीत,अमोल चंदनशिवे,संजय कारखिले,सुनिल कार्ले, वैभव मोरे,कोमल मोरे,मिनाक्षी मोरे,इ.मा मान्यवर उपस्थित होते वेगवेगळ्या जिल्ह्यातून अनेक प्रतिनिधी यावेळी उपस्थित झाले होते.पर्यावरणासाठी काम करण्याला राळेगण सिद्धी येथे आल्यावर आण्णा हजारे यांच्याकडून ऊर्जा मिळते असे पर्यावरण प्रेमी यांनी यावेळी सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धीरज वाटेकर यांनी केले.तर आभार श्री ज्ञानेश्वर क-हाळे यांनी मानले.

*पत्रकार कोंडीराम नेहे - लोहगांव
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस श्रीरामपूर - *9561174111*
close