shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

जिल्हा क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा



विद्यार्थी, विद्यार्थीनी, खेळाडूंसह  नागरिकांनी केला योगाचा सराव

अहमदनगर जिमाका वृत्तसेवा:
२१ जुन आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जिल्हा क्रीडा संकुल, बॅडमिंटन हॉल, वाडियापार्क,अहमदनगर येथे सामुहीक योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थी, विद्यार्थीनी, खेळाडू तसेच नागरिकांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवत योगाचा सराव केला.

            यावेळी उप विभागीय अधिकारी सुधीर पाटील, आरोग्यग्राम, जखनगांवचे सरपंच सुनिल गंधे, दिपक रिसे, सेल्फ केअर फाऊंडेशनच्या अध्यक्षा सविता धायतडक, सचिव प्रविण घायतडक, जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे आदी मान्यवर उपस्थित होते.

            कार्यक्रमात योग प्रात्यक्षिकाचे सादरीकरण अहमदनगर जिल्हा योगा व स्पोर्टस ट्रेनिंग सेंटरचे खेळाडुंनी केले तर  प्राणायामाचा सराव योगविदयाधामच्या श्रीमती. मीना देशपांडे यांनी व ध्यानधारणा ओंकार आर्ट ऑफ लिव्हींगच्या डॉ. सुपर्णा देशमुख यांनी उपस्थितांकडून करुन घेतला.

            यावेळी उप विभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी उपस्थितांना योगसंकल्प दिला.  कार्यक्रमाची सुरुवात पतंजली योग संस्थेच्या श्रीमती. कल्पना ठोकळ यांच्या प्रार्थनेने झाली करण्यात आली तर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची  सांगता करण्यात आली.

            कार्यक्रमाचे सुत्रसंचलन क्रीडा अधिकारी श्रीमती. दिपाली बोडके यांनी केले तर आभार वरिष्ठ क्रीडा अधिकारी भाऊराव वीर यांनी मानले.

            कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे विशाल गर्जे, ज्ञानेश्वर खुरंगे, रमेश जगताप, सत्यवान कदम, अहमदनगर जिल्हा योग व स्पोर्टस ट्रेनिंग सेंटरचे प्रशिक्षक उमेश झोटींग, कु. प्रणिता तरोटे, आप्पा लाडाणे, पतंजली योग समिती, आर्ट ऑफ लिव्हिंग, अहमदनगर, योगविदयाधाम यांनी परिश्रम घेतले.

पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर 
*9561174111
close