shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

मख़दुम सोसायटी व मराठा सेवा संघाच्या वतीने राजर्षी शाहु महाराज जयंती निमित्त मोफत वह्या वाटप



राजर्षी शाहु महाराजांनी प्राथमिक शिक्षण
 सक्तीचे व मोफत केले - डॉ कमर सुरुर 

अहमदनगर / प्रतिनिधी: 
राजर्षी शाहु महाराजांनी बहुजन समाजात शिक्षण प्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापुर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले.स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणुन त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी  १९१९ साली स्वर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरविण्याची पद्धत बंद केली. जाती भेद दुर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. १९१७ साली त्यांनी पुनरविवाहचा कायदा करुन विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता मिळवुन दिली असे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेच्या सहसचिव आंतरराष्ट्रीय शायरा डॉ कमर सुरुर यांनी केले. 
राजर्षी शाहु महाराज यांच्या १५० व्या जयंती निमित्त मखदुम सोसायटी, मराठा सेवा संघ व रहमत सुलतान फाउंडेशनच्या यांच्या संयुक्त विद्यमाने व विकास कांबळे, युनूसभाई तांबटकर, फैयाज मेंबर, अभय कांकरिया, बबलू सेठ, शरफुद्दीन सर आदिंच्या सहकार्याने केडगांव अहमदनगर येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना  आंतरराष्ट्रीय शायरा डॉ. कमर सुरुर यांच्या हस्ते मोफत वह्या व पाट्यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी मख़दुम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष आबीद दूल्हेखान, आस्मा शेख व आयेशा सुलताना उपस्थित होते. 
कार्यक़्रमाचे सुत्रसंचालन आयेशा सुलताना यांनी केले. तर आभार आस्मा शेख यांनी मानले. 

*ज्येष्ठ पत्रकार आबीद खान, अहमदनगर
*सहयोगी
स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - *9561174111
close