shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

शाॅर्ट फिल्म-'मौब्बु' विषयी भारत सातपुते यांचा विशेष लेख...!


     तुकाराम सोनाजी सुपारे उर्फ आकाश सुपारे यांची ही पहिली वहिली मराठी शाॅर्ट फिल्म..(कथा,पटकथा,दिग्दर्शक-आकाश सुपारे,
निर्माता व कला दिग्दर्शक-रमेश सखाराम जेठे,सर)
मी फेसबुकवर सक्रीय झालो, लिहायला,अनेकांना वाचायला लागलो..
"मौब्बु" लघुपटाला नुकतेच मिळालेले पारितोषिक

माणसं..
मोठी माणसं..
मोठ्या मनाची तरूण मुलं,मुली..
कवी,साहित्यिक,चित्रकार,पत्रकार,
व्यावसायिक,गायक,संपादक इत्यादि भेटत गेले तसतसा मी बहरत,
मोठा होत कुबेर झालो..
आकाश सुपारे  दगड-धोंडे,छिन्नी-हातोडीत, चित्रा-कच-यात मला सापडलेला चमकदार हिरा होय..
आकाशची एकेक रचना,
शब्दांची चपखल मांडणी नि मनात 'सूर्या'कडे झेपावणारा टवटवीत अंकुर..
मी आकाशचा नि हे कवितेचं मुक्त 'आकाश' माझं कधी झालं कळलंच नाही..
परवा पुण्यात गेलो नि वैचारिक नाळ जुळलेली असल्याने दाहेक मिनिटांसाठी भेटलो तेव्हा मुका होऊन पुढ्यात बसलो,
आकाशने मनात घाटत असलेली अख्खी फिल्म ऐकविली..
मी आनंदून गेलो कारण यासाठी आकाशच्या ख्याली मी योग्य माणुस होतो !
"मौब्बू" म्हणजे रात्र,अंधार..
डोळे मिटून अंधारात स्थिरावलो की सवय होते अंधाराची,नि उजेडाच्या तोंडओळखीलाही मन धजत नाही,
ही अंगिकारलेली गुलामी नव्हे काय ?
'मौब्बू'चं साकार होणं हा अंधारावर प्रहार नि प्रकाशाकडे चांद्रयान-वेगाने केलेलं यशवंत उड्डाण होय..
पंधरा-सोळा मिनिटांच्या "मौब्बू"त जान भरणा-या सर्व कलाकारांचं कसब वाखानण्यायोग्य आहे..
शाळेचा डरवेश नसलेला परकाश,
त्याला शिकविण्यासाठी धडपडणारी आई सावित्री..
सभोवार घाणीचं, अंध:श्रध्देचं बकालपण,
स्वच्छ भारतका इरादा..
पार्श्वभूमीत 'अयोध्या'..भंगारात आलेले ग्रंथ,टीव्ही इत्यादि..
'येथे लघवी करू नये-हुकमावरून' लिहिल्याजागी उभ्याने फळाफळा मुतणारा माणुस, 
सावित्रीने नाकाला लावलेला पदर..
प्रत्येक फ्रेम बोलकी करण्यात दिग्दर्शकाने आपलं कसब पणाला लावलं आहे यात शंका नाही..
कमाल दारिद्र्य,शिक्षणाची वाण नि अंध्दश्रध्देचा अंमल..
व्यसनाधीन अवस्था..
डोळे,नाक-तोंड बुडवून टाकणारा अंधार..
फुटक्या मुर्ती क.कुंडीत..
महापुरुष उजेड-साथीला..
दारूत बुडालेली माणसं पण दारूच्या बाटलीचा दिवा..
माणसांमधला अंतर्बाह्य कचरा साफ करून प्रकाशाकडे ही फिल्म नेते तेव्हा उजेड (दिवा) झालेली दारूची रिकामी बाटली सहज आधार बनते..
गोधडी ही वडार समाजाची धरोहर, गोधडीचं देखणेपण डोळ्यात भरतं तसं तिचं लुप्त होणं मन सुन्न करतं..
मुस्लिम भाबीच्या पोरी हाती अभ्यासायला छत्रपती शिवाजी महाराज,
महात्मा ज्योतीराव फुले नि 
डाॅ बाबासाहेब आंबेडकरांचे ग्रंथ देणे हे दिग्दर्शकाचं कमाल डोळसपण होय..
शाॅर्ट फिल्म "मौब्बु" तना-मनातला अंधार उपसून टाकणे व उजेड-वै-यांना नग्न करण्यात यशवंत ठरली असून हे काम साक्षी व्यवहारे,आदेश वैरागर बालाकार,
नाना मोरे,राणी कासलीवाल, 
राजेश नन्नवरे इ सर्व कलाकारांनी अत्युत्कृष्ठपणे जिवंत केले आहे..
डोळसपणे उजेड-वाट चालण्यासाठी 
जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतीराव फुले,
डाॅ बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या विचारांशिवाय तरणोपाय नाही हे भाड्याने महापुरूषांचे पुतळे घेऊन गेलेल्या भारत कांबळेंच्या वाणी आणि कथनीतून सहजी अधोरेखीत होते..
त्याच्या गळ्यातील सोन्याचे लाॅकेट व त्यातील "भीमसंविधान" सकारात्मक व सर्वहितकारी उजेड-संदेश देण्यात कामयाब ठरले आहे..
सावित्री या प्रसंगी सर्व महापुरूषांना कृतज्ञतापूर्वक वंदन करते हे खास उल्लेखनीय होय..
पाऊस,घराचं पावसात गळणं नि एका गळक्या थेंबाने विझविलेला दिप सजगपणे सर्वांनी चेतवून आपल्या आयुष्यातील अंधार उपसिण्याचे आवाहन करण्यात 'मौब्बू' ही शाॅर्ट फिल्म यशस्वी ठरली आहे..
सर्वांनी 'Black Solder' होऊन कार्य करावे लागणारय इतकेच !
"मौब्बु" या शाॅर्ट फिल्मची पुणे शाॅर्ट फिल्म फेस्टिव्हल साठी निवड होवुन बेस्ट स्क्रीन प्ले Best Expperimental Writer (screenplay) ॲवाॅर्ड साठी पाञ ठरलीय अनेक निष्णात ज्युरी व निवडक प्रेक्षकांच्या उपस्थितीत स्क्रीनिंग होईल नि "मौब्बु" विविध स्तरावरील अनेक पारितोषिके पटकाविल याची मला खात्री वाटते..
"मौब्बु"च्या संपूर्ण चमुला विविध स्तरावर यशवंत होण्यासाठी मंगलकामना..
अभिनंदन "मौब्बु"..
अभिनंदन तुकाराम (आकाश) सोनाजी सुपारे..
अभिनंदन रमेश सखाराम जेठे (सर)
अभिनंदन समग्र टिम..

भारत सातपुते
अंबाजोगाई 9/06 /2024
close