shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

श्रीरामपूर शहरातील अवैध धंदे बंद करण्याची भाजपची मागणी


श्रीरामपूर / प्रतिनिधी
श्रीरामपूर शहरात जुगार, मटका व इतर अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहेत. हे अवैध धंदे तातडीने बंद करावेत,अन्यथा येथील गांधी पुतळ्याजवळ उपोषण करण्यात येईल असा इशारा भारतीय जनता पक्षाच्या श्रीरामपूर शहर पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना दिला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे यांना भाजपचे शहर सरचिटणीस रवी पंडित शहर उपाध्यक्ष मिलिंदकुमार साळवे, भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष साजिद शेख यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने एक निवेदन देऊन या प्रश्नाकडे त्यांचे लक्ष वेधले आहे. 


याप्रसंगी शहर उपाध्यक्ष विजय देवकाते, अल्पसंख्याक मोर्चाचे शहराध्यक्ष मुन्ना शेख, राजेंद्र धामोणे, सुरेश बडजाते, अतुल देसरडा व इतर पदाधिकारी उपस्थित होते. श्रीरामपूर शहरात सध्या अवैध धंद्यांचा सुळसुळाट सुरू झालेला आहे. रहदारीच्या व वर्दळीच्या ठिकाणी अवैध सुरू झाले आहेत. त्यामुळे या अवैध धंद्यांकडे गरीब व्यक्ती आकर्षित होऊन त्यामध्ये दोन वेळची रोजी रोटी गमावत असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ येत आहे. त्यामुळे श्रीरामपूर शहरात सुरू असलेले मटका, जुगार, पत्त्याचे क्लब, हातभट्टी दारू असे अवैध धंदे त्वरित बंद करावेत, अशी मागणी भाजप शहर मंडलाच्या पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी शिवपूजे यांच्याकडे केली आहे.
*पत्रकार अफजल मेमन, श्रीरामपूर*
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - *9561174111*
close