shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

नवज्योती महिला मंडळाच्या वतीने जागतिक पर्यावरण दिन साजरा ...


प्रत्येकाने एक झाड लावुन ते जतन करून वाढवावे – – डॉ. महेंद्र घागरे

प्रतिनिधी : आसावरी वायकर

नाशिक ( पंचवटी ) :   दि . १५ /   पर्यावरण रक्षण ही काळाची गरज असून वृक्षतोड न करता ते जपणे व त्याचे जतन करणे ही आवश्यक बाब आहे. प्रत्येकाने आपआपल्या परीने राहत्या परिसरात एक झाड लावावे आणि ते जतन करून वाढवावे असे प्रतिपादन हरित मित्र परिवाराचे अध्यक्ष डॉ. महेंद्र घागरे यांनी केले. ते जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित ध्यास पर्यावरणाचा समतोल या नवज्योती महिला मंडळाच्या मुलाखतीपर कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. यावेळी सहसंचालक अध्यक्षा रंजना दालमिया, मंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

 ध्यास पर्यावरण सरक्षणाचा' कार्यक्रमात पुण्याचे हरित मित्र परिवाराचे संस्थापक डॉ. महेंद्र घागरे यांची माहितीपर मुलाखत मंडळाच्या माजी अध्यक्षा स्वाती माडीवाले यांनी घेतली. त्यावेळी बीज संकलन, बीज रोपण आणि देखरेख वाटपबाबत डॉ. घागरे यांनी माहिती दिली, तसेच पर्यावरण संरक्षण आजच्या काळाची खरी गरज असल्याचे नमूद केले . 

 हा उपक्रम राबविताना साधारण दोन लाख रोपे तयार होतील एवढे बियाणे डॉ. घागरे हे नवज्योती महिला मंडळाच्या माध्यमातून शाळांना आणि विद्यार्थ्यांना मोफत पुरविणार आहेत. तसेच ऑक्टोबर महिन्यात विविध शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचा मानस डॉ. घागरे यांनी व्यक्त केला .

यावेळी नवनिवर्वाचित अध्यक्षा अलका फळे यांनी कार्यक्रमात मनोगत व्यक्त केले. नयना सूर्यवंशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर सचिव शितल जैन यांनी अतिशय सुरेखरित्या आभार व्यक्त केले .
close